Birju Maharaj Passed Away : प्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज (Birju Maharaj) यांचं निधन झालं आहे.  वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  बिरजू महाराज यांना 1983 मध्ये पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. यासोबतच त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि कालिदास सन्मानही मिळाला आहे. बनारस हिंदू विद्यापीठ आणि खैरागड विद्यापीठानेही बिरजू महाराजांना मानद डॉक्टरेट बहाल केली होती. 


पंडित बिरजू महाराज यांची नात रागिनी महाराजने सांगितलं की, 'गेल्या महिन्यापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. काल मी त्यांना माझ्या हातानं जेवणं खाऊ घातले. त्यानंतर त्यांना मी कॉफी देखील तयार करून दिली. ते रात्री जेवण झाल्यानंतर गाण्याच्या भेंड्या खेळत होते. त्यांना अचानक श्वास घ्यायला त्रास झाला.'


पंतप्रधान मोदींनी पंडित बिरजू महाराज यांना वाहिली श्रद्धांजली
पंडित बरजू महाराज यांच्या निधनाची बातमी कळताच अनेक सेलिब्रिटी तसेच नेत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत बरजू महाराज यांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केले आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले, ' पंडित बरजू महाराज यांच्या निधनानं खूप दु:ख झाले.  त्यांनी भारतीय नृत्य कलेची जगभरात  विशेष ओळख निर्माण केली. '
 





केंद्रीय रक्षा मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, 'पंडित बिरजूजी महाराज यांनी कथ्थक नृत्यातील लखनौ घराणे जगभर लोकप्रिय केले. त्यांच्या निधनाने अतिशय दु:ख झाले.'


लखनौ घराण्यातील बिरजू महाराज यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1938 रोजी लखनौ येथे झाला. त्यांचं खरे नाव पंडित बृजमोहन मिश्रा होतं. कथ्थक नर्तक असण्यासोबतच ते शास्त्रीय गायकही होते. बिरजू महाराज यांचे वडील आणि गुरु आच्छान महाराज, काका शंभू महाराज आणि लच्छू महाराज हे देखील प्रसिद्ध कथ्थक नर्तक होते.


यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील पोस्ट शेअर केली आहे-







महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Arun Jakhade Passed Away : ग्रंथप्रकाशक, लेखक आणि ज्येष्ठ संपादक अरुण जाखडे यांचं निधन


Birju Maharaj Passed Away : प्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांचं निधन


दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा