Allu Arjun Voice in Pushpa Hindi Dubbing : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा: द राइज' (Pushpa : The Rise) सिनेमा बॉक्सऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. टॉलिवूडपासून ते बॉलीवूडपर्यंत सर्वत्र पुष्पा सिनेमाची चर्चा सुरू आहे. अल्लू अर्जुनच्या पुष्पाच्या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनला श्रेयस तळपदेने आवाज दिला आहे.
साऊथसह हा सिनेमा हिंदीतही प्रदर्शित झाला आहे. मात्र हिंदी भाषेतील पुष्पा सिनेमाला अल्लू अर्जुनने आवाज दिलेला नसून मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेने दिला आहे. श्रेयस तळपदेने पुष्पा सिनेमासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. 'पुष्पा द राइज' सिनेमाच्या निमित्ताने भारतातील सर्वात सामर्थ्यवान आणि स्टायलिश अभिनेत्याचा हिंदीमधील आवाज झाल्याबद्दल अभिमान वाटत असल्याचं श्रेयसने पोस्टमध्ये नमूद केलं आहे.
पुष्पा सिनेमा अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर हिंदी भाषेत झाला प्रदर्शित
पुष्पा सिनेमा अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर 14 जानेवारी रोजी हिंदी भाषेत प्रदर्शित झाला आहे. तर 7 जानेवारी रोजी हा सिनेमा तेलुग, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित झाला आहे. 'पुष्पा: द राइज' हा पुष्पा चित्रपटाचा पहिला भाग आहे. 2022 मध्ये या चित्रपटाचा दुसरा पार्ट प्रदर्शित होणार आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्यासोबतच फहाद फासिलने देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.
संबंधित बातम्या
Udayanraje On Pushpa : उदयनराजेंवर पुष्पा चित्रपटाचा प्रभाव, गाण्यावर धुंद होत उदयनराजे साताऱ्यातील सेल्फी पाँईंटवर
Kiran Mane : 'मुलगी झाली हो' मालिकेतून किरण माने यांना का काढलं? सहकलाकारांशी गैरवर्तन की राजकीय कारण?
'कहो ना प्यार है' लिहिणारे काळाच्या पडद्याआड, गीतकार अब्राहम अश्क यांचे कोरोनामुळे निधन
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha