Varsha Usgaonkar : वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) सध्या 'हवाहवाई' (Hawahawai) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी 'दिसण्यापेक्षा अभिनयाकडे लक्ष द्या', असा सल्ला काही अभिनेत्रींना दिला आहे. 


वर्षा उसगांवकर म्हणाल्या आहेत,"मिळालेली भूमिका, व्यक्तिरेखा साकारणं गरजेचं आहे. नायिकेने जर तशापद्धतीची भूमिका साकारली तर तिचं करिअर धोक्यात येईल असं पूर्वी होतं. पण आता असा विचार करणं चुकीचं आहे. मी तर त्याकाळीदेखील तशा पद्धतीच्या भूमिका केलेल्या आहेत. त्यावेळी मी असा विचार केला नाही. आताचा काळदेखील बदलला आहे. आता नायिकेचं वय बदलल आहे. पण आता 60 वर्षांचीदेखील नायिका असते. लोकांनीदेखील ते स्वीकारलं आहे. लग्न झाल्यानंतरदेखील आता नायिकेचं करियर चांगलं होतं. त्यामुळे मुलींनी अशापद्धतीचे नखरे करण्याची गरज नाही". 


'हवाहवाई' सिनेमाचे दिग्दर्शक महेश टिळेकर म्हणाले," दिसण्यापेक्षा तुमचा अभिनय महत्त्वाचा आहे. 'सांगा मी कशी दिसते' या गोष्टीकडे सध्याच्या अभिनेत्रींनी लक्ष देणं गरजेचं आहे. कलाकार 100% देत काम करणारा असेल तर काम करताना एक वेगळाच आनंद येतो". 


निमिशाची निवड कशी झाली? 


'हवाहवाई' या सिनेमात मराठमोळी अभिनेत्री मुक्ता बर्वे मुख्य भूमिकेत दिसणार होती. पण तिला कोरोनाची लागण झाल्याने तसेच तिला मालिका मिळाल्याने तिने ही भूमिका नाकारली. या सिनेमासाठी ग्लॅमर असणाऱ्या अभिनेत्री नको होत्या. मी दोन मुलींच्या आईची भूमिका का करू, मुलं नका दाखवू अशी कारणं देणाऱ्या अभिनेत्री नको होत्या. अशातच मी निमिशाचा 'द ग्रेट इंडियन किचन' हा गाजलेला सिनेमा पाहिला होता. त्यामुळे मी तिच्यासोबत संपर्क साधला आणि तिची निवड झाली. सगळचं जुळून आलं. ती केरळची जरी असली तरी तिचा जन्म मुंबईत झाला आहे. त्यामुळे 'हवाहवाई' या सिनेमासाठी शेवटी महाराष्ट्रातल्याच अभिनेत्रीची निवड झाली आहे.


संबंधित बातम्या


Mukta Barve : कोरोना झाला अन् संधी गेली; मुक्ता बर्वेच्या हातातून निसटली 'ती' भूमिका


Varsha Usgaonkar : कोळी समाजाच्या भावना दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नाही; वर्षा उसगांवकरांनी व्हिडीओ शेअर करत मागितली माफी