Vikram Vedha New Song : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि अभिनेता सैफ अली खानचा (Saif Ali Khan) आगामी 'विक्रम वेधा' (Vikram Vedha) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या सिनेमातील 'बंदे' (Bande) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 


'बंदे' या गाण्यात विक्रम आणि वेधा म्हणजेच सैफ अली खान आणि हृतिक रोशन अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत. या गाण्याचे बोल विक्रम आणि वेधा या दोन पात्रांविषयी भाष्य करणारे आहेत. हे गाणं एसएएम. सी. एसने संगीतबद्ध केलं असून गायक शिवमने हे गाणं गायलं आहे. 


30 सप्टेंबरला 'विक्रम वेधा' येणार प्रेक्षकांच्या भेटीला


'बंदे' हे गाणं येण्याआधी 'अल्कोहोलिया' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. 'बंदे' आणि 'अल्कोहोलिया' या दोन्ही गाण्यांचे बोल मनोज मुंतशिरने लिहिले आहेत. दोन्ही गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली असून प्रेक्षक आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. येत्या 30 सप्टेंबरला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 




'विक्रम वेधा' या सिनेमात प्रेक्षकांना थरार-नाट्य अनुभवायला मिळणार आहे. सिनेमातील अनेक ट्विस्ट आणि टर्न प्रेक्षकांचं लक्ष वेधणार आहेत. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा पुष्कर आणि गायत्रीने सांभाळली आहे. तर भूषण कुमार एस. शशिकांत आणि रिलायंस एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. 


मल्टी स्टारर 'विक्रम वेधा'


'विक्रम वेधा' या सिनेमात हृतिक रोशन आणि सैफ अली खानसह राधिका आपटे आणि योगिता बिहानी, रोहित सराफदेखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. 'विक्रम वेधा' हा सिनेमा 2017 साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या एका तामिळ सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. 


संबंधित बातम्या


Vikram Vedha : हृतिक-सैफचा ‘विक्रम वेधा’ रचणार नवा विक्रम! एक-दोन नव्हे तब्बल ‘इतक्या’ देशांमध्ये होणार रिलीज


Vikram Vedha : हृतिक-सैफचा ‘विक्रम वेधा’ रचणार नवा विक्रम! एक-दोन नव्हे तब्बल ‘इतक्या’ देशांमध्ये होणार रिलीज