Varsha Usgaonkar : वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) या मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी कोळी समाजाबद्दल एक वादग्रस्त विधान केलं होतं. त्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. आता या प्रकरणी त्यांनी हात जोडून कोळी समाजाची माफी मागितली आहे. माफी मागतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 


'यामिली' हा एक मासे विक्रेती करणारा खासगी अॅप आहे. या अॅपने गेल्या काही दिवसांपूर्वी एक जाहीरात प्रसिद्ध केली होती. ‘बाजार की मच्छी के साथ बदबू फ्री' अशा आशयाची ही जाहीरात होती. त्यामुळे ही जाहीरात चांगलीच व्हायरल झाली होती. वर्षा उसगांवकर यांनी या जाहीरातीत 'बाजारात अनेकदा कोकणींकडून माझी फसवणुक झाली आहे. बाजारातल्या पापलेटला इतका घाणेरडा वास येतो की, त्यावेळी मी हे पापलेट का घेतले, असे वाटून निराश झाले', असे विधान केले होते. 


'यामिली'च्या जाहीरातीनंतर कोळी समाज चांगलाच संतापला होता. त्यांनी कोळी समाजाची माफी मागावी अन्यथा सडलेले मासे खाऊ घालू अशा तीव्र शब्दात संताप व्यक्त केला होता. यानंतर ही जाहीरात फेसबुकवरुन काढून टाकण्यात आली. 'यामिली' या अॅपचं प्रमोशनदेखील वर्षा उसगांवकर यांनी केलं होतं. 



व्हिडीओ शेअर करत मागितली माफी


वर्षा उसगांवकर यांनी एक व्हिडीओ शेअर करत कोळी समाजाची माफी मागितली आहे. व्हिडीओ शेअर करत त्यांनी म्हटलं आहे," नमस्कार मी वर्षा उसगांवकर. यामिली अॅपबद्दल बोलताना जर माझ्याकडून कोळी समाजाच्या काही भावना अनावधानाने दुखावल्या गेल्या असतील तर मी त्यांची हात जोडून माफी मागते. त्यांच्या भावना दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. उलट कोळी समाजाबद्दल मला नितांत आदर आहे. त्यामुळे कोळी समाजातील बंधू-बघिणींची मी पुन्हा एकदा हात जोडून माफी मागते". 


संबंधित बातम्या


Justin Bieber : जस्टिन बीबरने वर्ल्ड टूर केली रद्द; सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती


Palyad Marathi Movie : रूढी-परंपरा, श्रद्धा-अंधश्रद्धा, ज्ञान-अज्ञान, सुख-दुःख यांचा वेध घेणारी सत्यकथा; 'पल्याड' चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित