Netflix 2022 Upcoming Web series And Movies : दिवसेंदिवस ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मची क्रेझ वाढताना दिसत आहे. सिनेप्रेमी सध्या सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहण्याऐवजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमा पाहायला पसंती दर्शवत आहेत. दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून येत्या दिवाळीत अनेक सिनेमे (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहेत. 

गंस अॅन्ड गुलाब :

'गंस अॅन्ड गुलाब' या वेबसीरिजच्या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा राज निदिमोरु आणि कृष्णा डीके यांनी सांभाळली आहे. 90 च्या दशकातील गुन्हेगारीवर भाष्य करणारी ही वेबसीरिज आहे. या वेबसीरिजमध्ये राजकुमार राव आणि दुलकर सलमान मुख्य भूमिकेत आहेत. 

बियॉन्ड द फेअरी टेल : 

दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा नुकतीच शिवन संगसोबत लग्नबंधनात अडकली आहे. लग्नामुळे नयनतारा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. आता त्यांच्या लग्नसोहळ्यावर आधारित 'बियॉन्ड द फेअरी टेल' ही वेबसीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळेच या वेबसीरिजचं नाव 'नयनतारा-बियॉन्ड द फेअरी टेल' असं आहे. 

चोर निकल के भागा :

'चोर निकल के भागा' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात यामी गौतम, सनी कौशल आणि शरद केळकर मुख्य भूमिकेत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक या सीरिजची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

कटहल : 

बॉलिवूड अभिनेत्री सान्या मल्होत्राच्या 'कटहल' सिनेमाची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. या सिनेमात सान्या एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसून येणार आहे. या सिनेमात सान्या केंद्रस्थानी आहे. 

मोनिका ओह माय डार्लिंग : 

'मोनिका ओह माय डार्लिंग' या सिनेमात प्रेक्षकांना थरार-नाट्य अनुभवायला मिळणार आहे. वासन बालाने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. राजकुमार राव, राधिका आपटे आणि हुमा कुरॅशी या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 

खुफिया : 

विशाल भारद्वाजचा 'खुफिया' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात विशाल 'मकबूल' और 'हैदर' फेम तब्बूसोबत दिसून येणार आहे. अमर भूषण लिखित 'एस्केप टू नोव्हेयर' हा कादंबरीवर बेतलेला 'खुफिया' हा सिनेमा आहे. 

राणा नायडू : 

'राणा नायडू' या बहुचर्चित वेबसीरिजची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. करण अंशुमानने या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सीरिजमध्ये वेंटेकेश दग्गुबाती आणि राणा दग्गुबाती स्क्रीन शेअर करताना दिसून येणार आहेत. 

कॅट : 

रणदीप हुड्डा ओटीटीवर पदार्पण करण्यास सज्ज आहे. 'कॅट' या वेबसीरिजमध्ये प्रेक्षकांना क्राईम थ्रिलर पाहायला मिळणार आहे. या सिनेमात रणदीप गुप्तहेराच्या भूमिकेत दिसून येणार आहे. 

स्कूप : 

'स्कूप' या वेबसीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा हंसल मेहता यांनी सांभाळली आहे. या सिनेमाचं कथानक टबिहाइंड द बार्स इन बायकुला- माई डेज इन प्रिजनट' या पुस्तकावर आधारित आहे. करिश्मा तन्ना या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. 

सूप : 

मनोज वाजपेयीचा आगामी 'सूप' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. या सिनेमात मनोज वाजपेयीसह अभिनेत्री कोंकणा सेनदेखील मुख्य भूमिकेत आहे. हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 

संबंधित बातम्या

Vikram Vedha Bande Song : 'विक्रम वेधा' सिनेमातील 'बंदे' गाणं आऊट; हृतिक रोशन अन् सैफ अली खान अॅक्शन मोडमध्ये

Amol Kolhe : महाराजांची भूमिका साकारणं मोठी जबाबदारी... 'शिवप्रताप गरुडझेप' अवघ्या देशाचं लक्ष वेधणार : डॉ. अमोल कोल्हे