एक्स्प्लोर

TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.

TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -

Salman Khan ची हायकोर्टात धाव

बॉलिवूड अभिनेता सलमान खानने तातडीचा दिलासा मागत हायकोर्टात धाव घेतली आहे. आपल्या बॉडीगार्डसह एका पादचाऱ्यावर हल्ला करुन त्याला धमकावल्याप्रकरणी सलमान आणि त्याच्या बॉडीगार्डवर अंधेरीच्या डीएननगर पोलीस ठाण्यात दाखल एफआयआर रद्द करण्यासाठी ही याचिका दाखल केली आहे. अंधेरी महानगर दंडाधिकारी कोर्टाने याच प्रकरणात आज (5 एप्रिल) हजेरीसाठी सलमानला समन्स पाठवलं आहे.

आलिया-रणबीर 'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर सध्या लग्नाच्या बातमीमुळे चर्तेत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार आलिया आणि रणबीर एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लग्न करणार आहेत. 17 एप्रिलला ते लग्नबंधनात अडकणार आहेत. आलिया-रणबीर 2018 पासून एकमेकांना डेट करत आहेत. 13 ते 17 एप्रिल दरम्यान त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे.

सेलिब्रिटींमध्ये रंगणार क्रिकेटची मॅच

क्रिकेट म्हणजे आपल्या सर्वांचाच जिव्हाळ्याचा विषय. मग त्यापासून आपले कलाकारही कसे दूर राहणार? अनेक जण क्रिकेटचे शौकीन आहेत. मात्र चित्रीकरणाअभावी, वेळेअभावी त्यांना आपली ही आवड जोपासता येत नाही. हेच कारण लक्षात घेऊन अभिनेता सुशांत शेलार यांनी मराठी बॉक्स सेलिब्रिटी क्रिकेट लीगची (एमबीसीसीएल) स्थापना केली आहे. 'शेलार मामा फाऊंडेशन' आणि 'प्लॅनेट मराठी' प्रस्तुत एमबीसीसीएलच्या लोगोचे नुकतेच अनावरण करण्यात आले आहे. या जबरदस्त लोगोमध्ये महाराष्ट्राची शान दर्शवणाऱ्या पिळदार मिश्या, फेटा, बॅट, बॉल आणि स्टंप दिसत आहेत. मराठीबाणा जपणारा हा लोगो समोर आल्यानंतर आता क्रिकेटप्रेमींना उत्सुकता लागून राहिली आहे ती एमबीसीसीएलची. त्यामुळे आता एमबीसीसीएलही  लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

'शेर शिवराज'चे नवे पोस्टर प्रदर्शित

अंगावर शहारे आणणारे 'शेर शिवराज'चे नवे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. पोस्टरमध्ये चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारताना दिसत आहे. 'शेर शिवराज' हा सिनेमा 29 एप्रिल 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. दिग्पाल लांजेकरने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.  

'मेरे देश की धरती' सिनेमाचे पोस्टर आऊट

'मेरे देश की धरती' (Mere Desh Ki Dharti) या सिनेमाचे नुकतेच एक पोस्टर आऊट झाले आहे. 6 मे ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'देश बदल रहा है' असे म्हणत या सिनेमाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. नव्या कल्पनांचा शोध घेऊन दोन इंजिनिअर्स तरुण गावचा कसा कायापलट करतात हे दाखवून देणारा 'मेरे देश की धरती' हा सिनेमा असणार आहे.

संबंधित बातम्या

Rashmika Mandanna : विजय थलापतीच्या आगामी सिनेमात झळकणार नॅशनल क्रश रश्मिका मंदाना, वाढदिवशी निर्मात्यांनी केली घोषणा

Kareena Kapoor : मलायका अरोराला भेटायला पोहोचली करीना कपूर, फोटोग्राफरच्या पायावरून गेली कार   

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Amruta Khanvilkar Himanshu Malhotra Divorce Rumors: अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
Colours Marathi Maha Episode: कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
Bhata Marathi Movie: समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster
समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster
Amruta Khanvilkar Himanshu Malhotra: अमृता खानविलकर घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? 18 महिन्यांपासून पतीपासून राहतेय वेगळी, 11 वर्षांनी सुखी संसाराचा काडीमोड?
अमृता खानविलकर घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? 18 महिन्यांपासून पतीपासून राहतेय वेगळी, 11 वर्षांनी सुखी संसाराचा काडीमोड?

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget