मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांनी कालच वेगळं होण्याची घोषणा केली. त्यांतर त्यांचे चाहते काहीसे नाराज झाले होते. मात्र या  घोषणेनंतर आज दोघेही पानी फाउंडेशनच्या एका कार्यक्रमात एकत्र आले होते. पानी फाऊंडेशनच्या झूम कॉलमध्ये सामील होत दोघांनी घटस्फोटावर पहिली प्रतिक्रिया दिली. दोघांनी यावेळी वेगळं राहूनही खुश असून एकमेकांना साथ देण्याविषयी बोलले. किरण आणि आमीरचे यांनी कार्यक्रमाच्या अगदी सुरुवातीला आपली प्रतिक्रिया दिली. 


व्हिडीओमध्ये आमीर खान म्हणाला की, "काल तुम्ही सर्वांनी माझ्या आणि किरणच्या घटस्फोटाविषयी ऐकलं आहे. काही लोकांना आमच्या निर्णयामुळे वाईट वाटलं असेल. पण आम्ही सदैव एकत्र राहू. आम्ही पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात राहणार आहोत.


पानी फाऊंडेशन आमच्या मुलाप्रमाणे


जसे आझाद हा आमचा मुलगा आहे, त्याचप्रमाणे पानी फाऊंडेशनही आमच्या मुलासारखं आहे. आपण सर्व एकत्र पानी फाऊंडेशन चालवत आहोत.आम्ही याक्षणी आमच्या शहराबाहेर आहोत परंतु आम्ही आमच्या कामामुळे तुम्हाला कायम आनंदित ठेऊ, अस आमीर खानने म्हटलंय.



तुमचं प्रेम आणि पाठिंब्याची आवश्यकता : किरण


किरण रावने म्हटलं की, यावेळी आम्हाला तुमचं प्रेम आणि पाठिंब्याची गरज आहे. आपण सर्वांनी आमच्यासोबत रहावे आणि प्रत्येक वेळी आम्हाला पाठिंबा द्यावा, अशी आमची इच्छा आहे. तुमच्या प्रेम आणि पाठिंब्यामुळेच आपण पानी फाउंडेशनला पुढे नेत आहोत. 


वेगळं होताना दोघांना काय म्हटलं?


आमिर खान आणि किरण राव यांनी एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध केलं आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की, "15 वर्षाच्या सुंदर संसारामध्ये आम्ही सुख, समाधान, आनंदाचे अनेक क्षण अनुभवले. विश्वास, आदर आणि प्रेम यामुळे आमचे संबंध सुंदर होत गेले. आता एक पती आणि पत्नीची जबाबदारी दूर सारुन आम्ही पालक आणि एक परिवाराच्या माध्यमातून आमच्या आयुष्याची नवीन सुरुवात करतोय. हा निर्णय आम्ही आधीच घेतला होता, आता त्याची अंमलबजावणी करण्याची योग्य वेळ आली आहे असं आम्हाला वाटतं."


इतर संबंधित बातम्या