मुंबई : बॉलिवूड स्टार आमिर खान आणि किरण राव यांनी एकमेकांपासून वेगळं होत घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. आपल्या 15 वर्षांच्या सुखी संसारानंतर त्यांनी हा निर्णय घेतला असून त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. मात्र आम्ही विभक्त होत असलो तरी एक पालक आणि परिवार म्हणून आम्ही  एकत्रित राहू असं या दोघांनी म्हटलंय. तरीही या दोघांच्या फॅन्सना या दोघांच्या वेगळं होण्याचं नेमक कारण समजत नाहीये. वेगळवेगळे अंदाज आता याबद्दल बांधले जात आहेत. त्यातच 'दंगल गर्ल' फातिमी सना शेख ट्विटरवर चर्चेत आहे. आमिर आणि किरणच्या वेगळं झाल्यानंतर फातिमा का चर्चेत हे पाहुयात. 


आमिर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटाचं कारण फातिमा शेख असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली आहे. आमिर आणि फातिमामधील जवळीत यामुळे आमिर आणि किरण यांचं 15 वर्षाचं नातं तुटल्याचं बोललं जात आहे. ट्विटरवर #FatimaSanaShaikh हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. फातिमाने आमिर खानसोबत दंगल सिनेमात काम केलं होतं. या सिनेमात फातिमाने आमिरच्या मुलीची भूमिका केली होती. 


Aamir Khan-Kiran Rao Divorce : 15 वर्षाच्या सुखी संसारानंतर आमीर खान आणि किरण राव यांचा वेगळं होण्याचा निर्णय


दंगल सिनेमातील फातिमाच्या कामाचं कौतुक झालं होतं. सिनेमाही सुपरहिट ठरला होता. त्यानंतर फातिमा आमिर खान सोबत पुन्हा एकदा 'ठग्स ऑफ हिंदुस्थान' सिनेमात झळकली होती. त्यानंतर आमिर आणि फातिमाबद्दल अनेक चर्चांना सुरुवात झाली होती. यामुळे किरण राव नाराज असल्याची देखील चर्चा होती. 


Aamir Khan Kiran Rao Divorce: मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान आणि किरण राव विभक्त झाल्यानंतर मुलांचं कसं होणार?


या चर्चांवर फातिमाने स्पष्टीकरण देताना म्हटलं होतं की, मी आमिर खान माझे गुरु आणि मार्गदर्शक आहेत. अशा चर्चांमुळे त्रास होतो. मात्र आमिर आणि किरण यांच्या वेगळं होण्याची बातमी आली आणि पुन्हा एकदा फातिमा चर्चेत आली.