बॉलिवूड अभिनेता आमीर खानने अलीकडेच आपल्या आणि पत्नी किरण राव यांच्या नात्याविषयी मोठा खुलासा केला आहे. आमीर खानने किरणपासून घटस्फोटाची घोषणा करत एक मोठं आणि विस्तृत संयुक्त निवेदन जारी केले आहे. यात त्यांनी घटस्फोटाच्या नियोजनापासून ते त्याच्या भावी नात्या संदर्भात माहिती दिलीय. या निवेदनात या दोघांचा एकुलता एक मुलगा आझाद याचा ताबा कोणाकडे असेल? याचाही उल्लेख केला आहे.


तीन मुलांचा बाप आहे आमीर खान
आमीर खानला एकूण तीन मुले आहेत. जुनैद आणि इरा ही दोन मुले आमीर खानच्या पहिल्या लग्नाच्या बायकोपासूनची आहेत. तर किरण रावसोबत लग्न केल्यानंतर त्यांना एक मुलगा झाला त्याचे आझाद नाव आहे. आज आम्ही तुम्हाला आमीर खानच्या तीन मुलांबद्दल सांगणार आहोत.


आझाद
आमीर खान आणि किरण राव यांच्या मुलाचे नाव आझाद आहे. जर या जोडप्याला घटस्फोट मिळणार असेल तर मग प्रत्येकाच्या मनात असा प्रश्न आहे की घटस्फोटानंतर या मुलाचा ताबा कोणाला मिळणार आहे. आमीर खान आणि किरण राव यांनी आपल्या संयुक्त निवेदनात मुलाच्या ताब्यात घेण्याचा उल्लेख केला आहे. निवेदनात असे लिहिले आहे की आम्ही एकत्र मुलाचे संगोपन करू. आमीर आणि किरणच्या भूमिकेतून हे स्पष्ट होतं की ते मुलाला संयुक्तपणे ताब्यात घेण्याची तयारी करत आहेत.


इरा खान
बॉलिवूड स्टार आमीर खानच्या लाडक्या मुलीचे नाव इरा खान आहे. इरा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह राहते. ती तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. अलीकडेच तिने सोशल मीडियावर उदासीनतेबाबतचा आपला अनुभवही शेअर केला, त्यानंतर ती वापरकर्त्यांमध्ये खूप लोकप्रिय झाली. आजकाल इरा तिच्या प्रियकराबरोबर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.






जुनैद खान
मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या आमीर खानचा मुलगा जुनैद खान त्याच्यासारखाच डॅशिंग आणि स्मार्ट आहे. जुनैद लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. सिद्धार्थ पी मल्होत्रा ​​यांच्या 'महाराजा' चित्रपटाद्वारे जुनैद आपल्या करिअरची सुरुवात करेल.