एक्स्प्लोर

'फिर हेरा फेरी'चे दिग्दर्शक, लेखक अभिनेते नीरज व्होरा यांचे निधन

'फिर हेरा फेरी' सिनेमाचे दिग्दर्शक, लेखक आणि प्रसिद्ध अभिनेते नीरज व्होरा यांचं आज पहाटे चारच्या सुमारास निधन झालं.

  मुंबई : 'फिर हेरा फेरी' सिनेमाचे दिग्दर्शक, लेखक आणि प्रसिद्ध अभिनेते नीरज व्होरा यांचं आज पहाटे चारच्या सुमारास निधन झालं. नीरज यांचे मित्र फिरोज नाडियावाला यांच्या जुहूमधील घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नीरज व्होरा यांना गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये हृदयविकाराचा झटका आणि ब्रेन स्ट्रोक झाल्यानंतर, त्यांच्यावर दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण यावेळी ते कोमामध्ये गेल्याने, त्यांना वेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. यानंतर त्यांचे मित्र फिरोज नाडियावाला यांनी त्यांना मुंबईतील आपल्या घरी आणलं होते. फिरोज नाडियावाला हेच त्यांची सर्व काळजी घेत होते. त्यांनी नीरज यांच्यासाठी आपल्या जुहू स्थित ‘बरकत व्हिला’मधील एका खोलीचे रुपांतर आयसीयूमध्ये केले होते. तसेच त्यांच्या देखभालीसाठी मार्च 2017 पासून 24 तासांसाठी एक नर्स, वॉर्ड बॉय, कुक यांची नेमणूक केली होती. याशिवाय, फिजियोथेरिपिस्ट, न्यूरो सर्जन, अक्यूपंक्चर थेरेपिस्ट आणि जनरल फिजिशियन हे देखील त्यांची वेळोवेळी तपासणी करत होते. ऑगस्ट महिन्युपासूनच त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. पण आज पहाटे चारच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नीरज यांनी फिर हेरा फेरी, खिलाडी 420, सारख्या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. रंगभूमीवरही ते सक्रिय होते. गुजराती भाषेतील ‘आफ्टरनून’ नाटकात त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती. नीरज हे एक उत्तम लेखक देखील होते. त्यांनी रंगीला, अकेले हम अकेले तुम, ताल, जोश, बदमाश, चोरी चोरी चुपके चुपके, आवारा पागल दिवाना सारख्या सिनेमांसाठी संवाद लेखन केलं होतं. काही महिन्यांपूर्वी त्यांनी हेराफेरीचा सीक्वेल हेराफेरी 3 वर काम करण्यास सुरुवात केली होती. पण प्रकृती अस्वास्थामुळे त्यात अनेक अडचणी येत होत्या.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी

व्हिडीओ

Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!
Sanjay Raut PC : मराठी माणसाच्या तोंडावर पिचकाऱ्या मारण्याचा काम भाजपने केलं, संजय राऊतांचा घणाघात
Lay Bhari Award 2025 : लय भारी पुरस्कार 2025
Rahul Narvekar On Election : पराभव दिसू लागल्यानं राऊतांचे बिनबुडाचे आरोप, नार्वेकरांची टीका
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
अशोक चव्हाणांनी 50 लाख घेऊन तिकीट दिलं, माजी नगरसेवकाचा आरोप; लातूरमध्येही निष्ठावंतांकडून बंडाचे निशाण
अशोक चव्हाणांनी 50 लाख घेऊन तिकीट दिलं, माजी नगरसेवकाचा आरोप; लातूरमध्येही निष्ठावंतांकडून बंडाचे निशाण
Gold Rate : गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
Marathi Sahitya Sammelan: विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
KDMC मध्ये महायुतीची घोडदौड, 9 उमेदवार बिनविरोध, रवींद्र चव्हाणांपाठोपाठ श्रीकांत शिंदेंचाही मास्टरस्ट्रोक
KDMC मध्ये महायुतीची घोडदौड, 9 उमेदवार बिनविरोध, रवींद्र चव्हाणांपाठोपाठ श्रीकांत शिंदेंचाही मास्टरस्ट्रोक
Embed widget