Dior Fashion Show Mumbai: क्रिश्चियन डियोर फॅशन शो-2023 (Christian Diors Show) मध्ये अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. हा फॅशन शो मुंबईमध्ये (Mumbai) गेटवे ऑफ इंडिया (Gateway of India) समोर पार पडला. या कार्यक्रमाला अनुष्का शर्मा (Anushka Sharma), विराट कोहली (Virat Kohli), सोनम कपूर (Sonam Kapoor), अनन्या पांडे (Ananya Panday), श्वेता बच्चन (Shweta Bachchan), मीरा राजपूत (Mira Rajput), अभिनेत्री रेखा (Rekha) या सेलेब्रिटींनी हजेरी लावली. तसेच क्रिश्चियन डिओरच्या क्रिएटिव्ह डायरेक्टर मारिया ग्राझिया चिउरी या देखील या शोमध्ये उपस्थित होत्या. ईशा अंबानी (Isha Ambani) आणि राधिका मर्चेंट (Radhika Merchant) यांनी देखील या क्रिश्चियन डिओर फॅशन शो-2023 मध्ये हजेरी लावली.
क्रिश्चियन डिओर फॅशन शो-2023 मुंबईमध्ये पार पडला. या फॅशन शोमध्ये काही मॉडेल्सनं गेटवे ऑफ इंडिया समोर रॅम्प वॉक केला. या फॅशन शोमध्ये अनेक सेलिब्रिटींनी खास लूकमध्ये हजेरी लावली.
अभिनेत्री रेखाचा लूक
बॉलिवूडमधील इव्हरग्रीन अभिनेत्री रेखानं डिओर फॅशन शो-2023 मध्ये ट्रेडिशनल लूकमध्ये हजेरी लावली. कांजीवरम, गोल्डन ज्वेलरी आणि गोल्ड पोटली बॅग असा लूक रेखानं केला होता.
विरुष्कानं वेधलं अनेकांचे लक्ष
अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली यांनी डिओर फॅशन शोमध्ये खास लूकमध्ये हजेरी लावली. यावेळी अनुष्कानं Yellow कलरचा ड्रेस, गोल्डन अँड ब्लॅक हिल्स असा लूक केला होता. अनुष्कानं एक छोटी Yellow बॅग देखील कॅरी केली होती. तर विराट हा यावेळी व्हाइट शूज, खाकी सूट अशा कूल लूकमध्ये दिसला.
इतर महत्त्वाच्या बातम्या: