एक्स्प्लोर
'बिग बॉस'फेम पूजा मिश्रावर गँगरेप, तिघांविरुद्ध एफआयआर
जयपूर : 'बिग बॉस'च्या पाचव्या पर्वामुळे चर्चेत आलेली मॉडेल, अभिनेत्री पूजा मिश्राने आपल्यावर गँगरेप झाल्याचा आरोप केला आहे. 'अभी तो पार्टी शुरु हुई है' या नवीन टीव्ही शोच्या शूटिंगदरम्यान जयपूरमध्ये तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याचा दावा पूजाने केला आहे. 'अमर उजाला' ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
13 जून रोजी जेवणातून गुंगीचं औषध देत आपल्यावर तीन व्हिडिओग्राफरनी बलात्कार केला, अशी तक्रार पूजाने केली आहे. तिघांना तिने 8 हजार रुपयांच्या मोबदल्याच्या आमिषाने बोलावलं होतं. शूटिंग पूर्ण झाल्यानंतर तिने त्यांना पार्टीसाठी बोलावलं. मात्र पार्टी झाल्यानंतर जेवणातून गुंगीचं औषध देत आपल्यावर गँगरेप केल्याचा कांगावा तिने केला आहे.
तिघांवर कलम 376 (बलात्कार) आणि कलम 384 (ब्लॅकमेल) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, ज्या सलूनमध्ये पूजा मिश्राची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, त्या देशवाल यांनी पूजावरही आरोप केले आहेत. आपल्या सलूनमधील कर्मचाऱ्यांशी गैरवर्तणूक केल्याचा दावा त्यांनी केला आहे. आपल्याला न विचारता सलूनमधील महागडे प्रॉडक्ट वापरल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्यासाठी दीड लाखांचं बिल लावल्यामुळे पूजाने धमकावल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात पूजाने एका हॉटेलमधील कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केलं होतं. गुंगीचं औषध देऊन आपला विनयभंग केल्याची तक्रार तिने उदयपूरमध्ये नोंदवली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement