Entertainment News Live Updates 12 october : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Mili: जान्हवी कपूरच्या (Janhvi Kapoor) मिली चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. हा लूक जान्हवीनं सोशल मीडियावर शेअर केला. 'एक तासात तिचं आयुष्य बदलते' असं कॅप्शन जान्हवीनं 'मिली' (Mili)चा लूक शेअर करुन दिलं आहे.
Double XL Trailer: सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि हुमा कुरेशी (Huma Qureshi) यांच्या 'डबल एक्सएल' (Double XL) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये क्रिकेटर शिखर धवन देखील दिसत आहे. 4 नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
36 Gunn Trailer: लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असे आपल्याकडे म्हणतात. ग्रह-तारे, पत्रिका, एका भेटीतच साताजन्माच्या गाठी बांधणे वगैरे या सगळयाच्या पलीकडे जाऊन नव्या नात्याची सुरुवात करीत असताना कुंडलीपेक्षा एकमेकांची मतं जुळणं महत्त्वाचं असतं हा विचार मांडणारा समित कक्कड दिग्दर्शित '36 गुण' (36 Gunn) मराठी चित्रपट 4 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तत्पूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर लॉच सोहळा नुकताच संपन्न झाला. संतोष जुवेकर आणि पूर्वा पवार यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात पुष्कर श्रोत्री, विजय पाटकर, वैभव राज गुप्ता, स्वाती बोवलेकर हे कलाकार आहेत.
पाहा ट्रेलर:
बादशाहच्या आयुष्यात नव्या मुलीची एन्ट्री?
बादशाह आणि अभिनेत्री ईशा रिखी (Isha Rikhi) यांच्या नात्याबाबात सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. दोघे एकमेकांना डेट करत आहेत, असं म्हटलं जात आहे.दोघांची ओळख एका कॉमन फ्रेंडद्वारे झाली. त्यानंतर दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली, अशी चर्चा सध्या सुरु आहे. 2012 पासून ईशा ही अभिनयक्षेत्रात काम करत आहे. 2018 मध्ये रिलीज झालेल्या नवाबजादे या चित्रपटात ईशानं प्रमुख भूमिका साकारली.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Bigg Boss Marathi 4: छोट्या पडद्यावरील शो 'बिग बॉस मराठी'चा(Bigg Boss Marathi 4) चौथा सीझन आता प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या सीझनमध्ये प्रेक्षकांना स्पर्धकांची भांडणं, टास्क आणि ड्रामा हे सर्व बघायला मिळत आहे. नुकत्याच एका एपिसोडमध्ये अक्षय केळकरनं एक अजब मागणी केली आहे. तर अमृता धोंगडेला कुटुंबाची आठवण आल्यानं अश्रू अनावर झाले.
BIGG BOSS MARATHI: बिग बॉसचा चौथा सीझन सध्या प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या सीझनमधील स्पर्धांच्या खेळानं अनेकांचे लक्ष वेधले आहे. या आठवड्यात कोणता स्पर्धक बिग बॉसच्या घरातून बाहेर पडेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नुकताच एक बिस बॉस मराठीच्या आगामी एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Elnaaz Norouzi: इराणमधील (Iran) हिजाब विरोधी चळवळ दिवसेंदिवस आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. आता हिजाब विरोधी चळवळीचं लोण जगभरात पसरलं आहे. विविध सेलिब्रिटी आणि नेटकरी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन इराणमधील हिजाब प्रकरणावर त्यांची प्रतिक्रिया देत आहेत. नुकताच सेक्रेड गेम्स या वेब सीरिजमधील अभिनेत्री एलनाज नौरोजीने (Elnaaz Norouzi) सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये ती महिलांच्या अधिकारांबद्दल आणि हक्कांबद्दल भाष्य केलं आहे.
पाहा व्हिडीओ
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
कतरिना, सिद्धांत आणि ईशान यांच्या 'फोन भूत' चा ट्रेलर रिलीज; चित्रपट 'या' दिवशी होणार प्रदर्शित
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) , अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) आणि ईशान खट्टर (Ishaan khatter) अभिनीत 'फोन भूत'च्या पहिल्या पोस्टरपासूनच प्रेक्षक चित्रपटाची झलक पाहण्यासाठी उत्सुक आहेत. दर्शकांची उत्सुकता लक्षात घेऊन निर्मात्यांनी 'फोन भूत' (PhoneBhoot) चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित केला. हॉरर कॉमेडी या मनोरंजक शैलीसाठी हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये चर्चेत असतानाच, कतरिना कैफला प्रथमच सुंदर भूताच्या रुपात पाहण्यासाठी देखील प्रेक्षक उत्सुक आहेत. अखेरीस, आता प्रतीक्षा संपली असून, निर्मात्यांनी आज 'फोन भूत'चा विस्मयकारक ट्रेलरचे अनावरण केले आहे.
‘विक्रम वेधा’ने पार केला 100 कोटींचा टप्पा! बॉक्स ऑफिसवर दिसली ह्रतिक-सैफच्या जोडीची जादू!
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) यांचा 'विक्रम वेधा' (Vikram Vedha) हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन आता 10 दिवस उलटले आहेत. बॉक्स ऑफिसच्या जगतात या चित्रपटाने एक मैलाचा टप्पा पार केला आहे. होय, 'विक्रम वेधा'ने जगभरात 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. तर, रिलायन्स एंटरटेनमेंटच्या प्रॉडक्शन अंतर्गत तयार झालेल्या या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 10 दिवसांत एकूण 69 कोटींहून अधिक कमाई केली आहे.
Karwa Chauth: सर्व प्रकारचे सण, उत्सव, परंपरा या बॉलिवूड चित्रपटांमध्ये बघायला मिळतात. उद्या (13 ऑगस्ट) 'करवा चौथ' (Karwa Chauth) हा सण देशभरात साजरा केला जाणार आहे. करवा चौथला करक चतुर्थी असेही म्हटले जाते. विवाहित स्त्रियांव्यतिरिक्त अविवाहित मुलीदेखील (ज्यांचे लग्न निश्चित झाले आहे) या दिवशी निर्जल उपवास करतात. आणि चंद्राकडे पाहून उपवास सोडण्याची प्रथा आहे. काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये हा सण अगदी खास पद्धतीनं दाखवण्यात आला आहे. करवा चौथ हा सण अनोख्या पद्धतीने साजरा करणारे बॉलिवूड चित्रपट कोणते? ते जाणून घेऊयात...
कभी खुशी कभी गम (Kabhi Khushi Kabhie Gham)
कभी खुशी कभी गम या चित्रपटातील बोले चुडीया हे गाणं आजही प्रेक्षक आवडीनं ऐकतात. या गाण्यात करीना कपूर, हृतिक रोशन, काजोल, शाहरुख खान हे सर्व जण 'करवा चौथ' हा सण साजरा करताना दिसत आहेत. अगदी खास पद्धतीनं या चित्रपटात करवा चौथ सण दाखवण्यात आला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -