मिसेस मुख्यमंत्रीही म्हणतात 'बाईपण भारी देवा'..; नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या...

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 28 Sep 2023 04:10 PM
Telly Masala : पुण्यात कलावंत ढोल ताशा पथकाचा गजर ते लता दिदी पांढऱ्या रंगाची साडी का नेसायच्या? जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या... Read More
मिसेस मुख्यमंत्रीही म्हणतात 'बाईपण भारी देवा'..; नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या...
Thane : ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मंगळागौर कार्यक्रमात मिसेस मुख्यमंत्री लता एकनाथ शिंदेही (Lata Eknath Shinde) सहभागी झाल्या होत्या. Read More
Ranbir Kapoor : रणबीरने वाढदिवशी चाहत्यांना दिली खास भेट; 'Animal'चा धमाकेदार टीझर आऊट!
Animal Teaser : रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. Read More
Siddharth Jadhav : आता होऊ दे धिंगाणा म्हणत सिद्धार्थ जाधवचं ढोल वादन; पुण्यात कलावंत ढोल ताशा पथकाचा गजर
Kalawant Dhol Tasha Pathak : पुण्यात कलावंत ढोल ताशा पथकाचा जल्लोष पाहायला मिळाला आहे. Read More
Fukrey 3 : मनोरंजनाचा ट्रिपल धमाका देणारा 'फुकरे 3'
Fukrey 3 Review : 'फुकरे 3' हा सिनेमा सिनेमा आता सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. Read More
Happy Birthday Ranbir Kapoor : 'रॉकस्टार' ते 'संजू'; IMDb वरील रणबीर कपूरच्या 'Top 10' सिनेमांबद्दल जाणून घ्या...
Ranbir Kapoor : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने अनेक गाजलेल्या सिनेमांत काम केलं आहे. Read More
Lata Mangeshkar : लता मंगेशकर पांढऱ्या रंगाची साडी का नेसायच्या? संगीत विश्वावर अधिराज्य गाजवणाऱ्या दिदींना आवडायचे हिऱ्यांचे दागिने
Lata Mangeshkar : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांनी संगीतक्षेत्रात आपली वेगळी छाप उमटवली आहे. Read More
Shah Rukh Khan : "विराट कोहली आपला जावई आहे"; शाहरुख खान असं का म्हणाला? जाणून घ्या...
Shah Rukh Khan : 'आस्क एसआरके' (Ask Srk) या सेशनच्या माध्यमातून शाहरुख खानने चाहत्यांसोबत संवाद साधला आहे. Read More
Raj Thackeray : "स्वत:चं मुस्लिम आडनाव पण..."; दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्यानंतर राज ठाकरेंनी केलं वहिदा रेहमान यांचं कौतुक
Raj Thackeray On Waheeda Rehman : दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्यानंतर राज ठाकरे यांनी वहिदा रेहमान यांचं कौतुक केलं आहे. Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Sangeet Devbabhali : 'संगीत देवबाभळी'चा कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या बी. ए. अभ्यासक्रमात समावेश


भद्रकाली प्रॉडक्शन्सच्या इन्स्टाग्रामवर पेजवर एक खास पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये लिहिलं आहे, "भद्रकाली प्रॉडक्शन्स"च्या प्राजक्त देशमुख लिखित 'संगीत देवबाभळी' या मराठी रंगभूमीवरील माईलस्टोन नाटकाचा या वर्षीपासून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील बी.ए. मराठी भाग 2 सत्र 3 च्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. प्राजक्त देशमुख चे मनःपूर्वक अभिनंदन!" या पोस्टला कमेंट करुन अनेकांनी 'संगीत देवबाभळी' नाटकाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. 


Sukh Mhanje Nakki Kay Asta: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’च्या प्रोमोला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले, 'दु:खा म्हणजेच हेच असतं...'


Sukh Mhanje Nakki Kay Asta: "सुख म्हणजे नक्की काय असतं" (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या छोट्या पडद्यावरील मराठी मालिके वेगवेगळे ट्वीस्ट अँड टर्न्स येत असतात. नुकताच या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोला अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या नुकत्याच शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, शालिनी, देवकी आणि मल्हार हे जयदीपला एका खड्यात पुरताना दिसत आहेत. त्यानंतर गौरी बाप्पाकडे प्रार्थना करत म्हणते, 'बाप्पा जयदीपला माझ्यापासून लांब घेऊन जाऊ नको.' यावर एक चिमुकली गौरीला म्हणते, 'बप्पाचा उंदीर मामा आहे ना तुला मार्ग दाखवायला' त्यानंतर प्रोमोमध्ये एक उंदीर दिसतो.  'बाप्पाचा उंदीर मामा दाखवणार गौरीला जयदीपपर्यंत पोहोचण्याचा मार्ग... 'सुख म्हणजे नक्की काय असतं !' असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलं आहे.


Jawan Trailer: जबरदस्त डायलॉग्स, अॅक्शन सीन्स आणि किंग खानचे वेगवेगळे लूक्स; 'जवान' चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज


Jawan Trailer Release:  अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) जवान (Jawan) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरमध्ये शाहरुख हा विविध लूक्समध्ये दिसत आहे.  तसेच या ट्रेलरमधील डायलॉग्स  आणि अॅक्शन सीन्स यांनी अनेकांचे लक्ष वेधले आहे. जवान या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन ट्रेलरमधील शाहरुखच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.