एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Raj Thackeray : "स्वत:चं मुस्लिम आडनाव पण..."; दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्यानंतर राज ठाकरेंनी केलं वहिदा रेहमान यांचं कौतुक

Raj Thackeray On Waheeda Rehman : दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्यानंतर राज ठाकरे यांनी वहिदा रेहमान यांचं कौतुक केलं आहे.

Raj Thackeray On Waheeda Rehman Honoured With Dadasaheb Phalke Award : ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रेहमान (Waheeda Rehman) यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार (Dadasaheb Phalke Award) जाहीर झाला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. पुरस्कार जाहीर झाल्याने वहीदा रेहमान यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील ट्वीट करत वहिदा रेहमान यांचं कौतुक केलं आहे. 

राज ठाकरेचं ट्वीट काय? (Raj Thackeray Tweet)

वहिदा यांचं अभिनंदन करत राज ठाकरे म्हणाले,"वहिदा रेहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित झाला. त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन. 1956 ला राज खोसला यांच्या 'सीआयडी' सिनेमातून करिअरला सुरुवात करत ते आजच्या तारखेपर्यंत सक्रिय असणाऱ्या वहिदाजी या भारतीय सिनेमाचा जवळपास 60 वर्षांचा इतिहास आहे". 

राज ठाकरे यांनी पुढे लिहिलं आहे,"तुम्ही जे निवडता, त्यावर तुमची श्रद्धा असेल आणि कामाप्रती निष्ठा असेल तर तुम्ही अगदी पहिल्या दिवसापासून तुमचे नियम लोकांना स्वीकारायला लावू शकता हे वहिदाजींनी दाखवून दिलं. पहिल्याच सिनेमात त्यांनी एका सीनसाठी मी वेडेवाकडे कपडे घालून शॉट देणार नाही असं ठासून सांगितलं. पहिलाच सिनेमा आहे, दिग्दर्शक जे सांगेल ते ऐकलं पाहिजे इत्यादी गोष्टींना बाजूला सारत, मी जर या क्षेत्रात टिकणार असेन तर माझ्या तत्त्वांशी मी तडजोड करणार नाही हे सांगणं सोपं नाही. पण ते वहिदाजींना जमलं". 

स्वत:चं मुस्लिम नाव आडनाव लपवण्याच्या भानगडीत त्या  कधी पडल्या नाहीत : राज ठाकरे

वहिदा यांचं कौतुक करत राज ठाकरे म्हणाले,"स्वत:चं मुस्लिम नाव आडनाव पण लपवण्याच्या भानगडीत त्या कधी पडल्या नाहीत आणि त्यांचं हिंदुस्थानीपण इतकं पक्व होतं की त्यांचा धर्म लोकांच्या मनाला शिवला पण नाही. अशा व्यक्तीला हा सन्मान मिळणं यासारखी आनंदाची गोष्ट नाही. अर्थात वहिदाजीच नाहीत. तर कुठल्याही कलाकाराला हे पुरस्कार थोडे आधी मिळायला काहीच हरकत नाही. पण असो...वहिदाजींना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मन:पूर्वक शुभेच्छा". 

राज ठाकरेंच्या ट्वीटवर कमेंट्सचा वर्षाव

राज ठाकरे यांच्या ट्वीटवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. आजकाल वेडे वाकडे कपडे परिधान करुन काम करणारे आहेत. तत्त्व चुलीत गेली असं ठासून सांगणाऱ्या खूप अभिनेत्री आहेत. पण वहिदासारखी तत्त्व जोपासणारी व्यक्ती सापडणार नाहीत..या पुरस्कारासाठी उशीर झाला, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तसेच वहिदा यांना शुभेच्छाही दिल्या आहेत. 

वहिदा रेहमान या मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांत काम केलं आहे. एक फूल चार काँटे, चाँदनी, दिल्ली 6, बीस साल बाद अशा अनेक सुपरहिट सिनेमांचा त्या भाग आहेत. आपल्या अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.

संबंधित बातम्या

Waheeda Rehman: ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रेहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर; अनुराग ठाकूर यांनी ट्वीट शेअर करुन दिली माहिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde on CM: एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
Maharashtra vidhansabha results 2024 : परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
Maharashtra Assembly Election Result : मुहायुतीची बुलेट ट्रेन सुस्साट, महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड, नियम काय सांगतो?
मुहायुतीची बुलेट ट्रेन सुस्साट, महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड, नियम काय सांगतो?
Eknath Shinde : हा विजय लाडक्या बहिणींचे प्रेम, आमच्या कामाची पोचपावती; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
हा विजय लाडक्या बहिणींचे प्रेम, आमच्या कामाची पोचपावती; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024Maharashtra Election Result 2024 :निवडणुकीत कोणते मुद्दे चर्चेत राहिले?Uday Tanpathakयांचं विश्लेषणMaharashtra Election Result 2024:सत्तेचा मार्ग विदर्भातून?जनता ठरवणार खरी शिवसेना, राष्ट्रवादी कोणतीMaharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde on CM: एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
Maharashtra vidhansabha results 2024 : परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
Maharashtra Assembly Election Result : मुहायुतीची बुलेट ट्रेन सुस्साट, महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड, नियम काय सांगतो?
मुहायुतीची बुलेट ट्रेन सुस्साट, महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड, नियम काय सांगतो?
Eknath Shinde : हा विजय लाडक्या बहिणींचे प्रेम, आमच्या कामाची पोचपावती; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
हा विजय लाडक्या बहिणींचे प्रेम, आमच्या कामाची पोचपावती; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Vidhan Sabha Election Results 2024 : महाराष्ट्राचे नवे आमदार, सर्व विजयी उमेदवारांची यादी, पाहा
महाराष्ट्राचे नवे आमदार, सर्व विजयी उमेदवारांची यादी, पाहा
Maharashtra vidhansabha Results 2024 देवाभाऊंचं यश पाहून सख्खा भाऊ पहिल्यांदाच टीव्हीवर; आशिष फडणवीस मुख्यमंत्रीपदाबाबत स्पष्टच म्हणाले....
देवाभाऊंचं यश पाहून सख्खा भाऊ पहिल्यांदाच टीव्हीवर; आशिष फडणवीस मुख्यमंत्रीपदाबाबत स्पष्टच म्हणाले....
Mahad Assembly Election results : ठाकरेंच्या पहिल्या उमेदवाराकडून पराभव मान्य, भरतशेठ गोगावलेंचा विजय जवळपास निश्चित
ठाकरेंच्या पहिल्या उमेदवाराकडून पराभव मान्य, भरतशेठ गोगावलेंचा विजय जवळपास निश्चित
Eknath Shinde vs Uddhav Thackeray: अबतक 56! खरी शिवसेना कोणाची, फैसला झाला? ठाकरेंना धक्का, एकनाथ शिंदेंना घवघवीत यश
अबतक 56! खरी शिवसेना कोणाची, फैसला झाला? ठाकरेंना धक्का, एकनाथ शिंदेंना घवघवीत यश
Embed widget