Leo OTT Release Date Announced: बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर थलापती विजयचा 'लियो' ओटीटीवर होणार रिलीज; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 20 Nov 2023 08:37 PM
Madhuri Dixit: माधुरी दीक्षितचा विशेष पुरस्काराने गौरव; अनुराग ठाकूर यांनी ट्वीट शेअर करुन दिली माहिती
Madhuri Dixit: माधुरीला तिच्या अभिनयासाठी एका खास पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले. याबाबत अनुराग ठाकूर यांनी ट्वीट शेअर करुन माहिती दिली आहे. Read More
Leo OTT Release Date Announced: बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर थलापती विजयचा 'लियो' ओटीटीवर होणार रिलीज; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या
Leo OTT Release Date Announced: लियो हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होण्याची अनेक जण वाट बघत होते. आता प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आहे. कारण थलापती विजयचा लियो हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होत आहे. Read More
VIDEO: वायर,काचा आणि पिझ्झानंतर आता माशी; उर्फीच्या अतरंगी ड्रेसची सोशल मीडियावर चर्चा
Uorfi Javed:  नुकताच उर्फीनं तिच्या खास लूकचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. Read More
Animal Trailer: प्रतीक्षा संपली! रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' चित्रपटाचा ट्रेलर 'या' दिवशी होणार रिलीज
Animal Trailer: 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाच्या ट्रेलरची रणबीरचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाचा ट्रेलर कधी रिलीज होणार? हे जाणून घेऊयात... Read More
December Release Movies: वर्षाचा शेवट होणार मनोरंजनात्मक! एकाच दिवशी रिलीज होणार 'हे' मराठी चित्रपट
December Release Movies: डिसेंबर महिन्यामध्ये काही मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. जाणून घेऊयात या चित्रपटांबद्दल... Read More
Shiv Thakare : 'झलक दिखला जा'चा रॉकस्टार 'आपला माणूस' शिव ठाकरे!
Shiv Thakare : 'आपला माणूस' शिव ठाकरे हा 'झलक दिखला जा 11' (Jhalak Dikhhla Jaa 11) या कार्यक्रमाचा रॉकस्टार आहे. Read More
Anushka Sharma : फायनलसाठी अनुष्का शर्माने घातलेल्या ड्रेसची किंमत किती? तुम्हालाही परवडेल!
Anushka Sharma Dress Price : अनुष्का शर्माने वर्ल्ड कप फायनलला फक्त सात हजार किंमतीचा ड्रेस परिधान केला होता. Read More
Koffee With Karan 8: वरुण म्हणतो, "करण जोहर घर तोडे" तर सिद्धार्थनं सांगितला मजेशीर किस्सा; 'कॉफी विथ करण' चा नवा प्रोमो आऊट
Koffee With Karan 8: कॉफी विथ करण या कार्यक्रमाचा एक नवा प्रोमो करणनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अभिनेता वरुण धवन  आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे काही मजेशीर किस्से सांगताना दिसत आहेत.  Read More
Tiger 3 Box Office Collection : 'वर्ल्ड कप 2023'चा सलमान खानला मोठा फटका; वीकेंड असूनही 'टायगर 3'च्या कमाईत घसरण
Tiger 3 : सलमान खानच्या 'टायगर 3' या सिनेमाला 'वर्ल्ड कप 2023'चा (World Cup 2023) मोठा फटका बसला आहे. Read More
World Cup 2023 : वर्ल्ड कपमध्ये भारताचा पराभव अन् अमिताभ बच्चन ट्रोल; नेटकरी म्हणाले,"एक सामना पाहिला नसता तर"
World Cup 2023 : वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताचा पराभव झाल्यानंतर अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना ट्रोल करण्यात येत आहे. Read More
Virat Kohli Anushka Sharma : वर्ल्डकप गमावला, डोळ्यांच्या कडा पाणावल्या; विराटची अनुष्काला कडकडून मिठी, रडू आवरेना
Virat Kohli Anushka Sharma : फायनल सामना हारल्यानंतर (IND vs AUS) विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये विराट आणि अनुष्का खूप भावुक दिसत आहेत. Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


12th Fail And Tejas Box Office Collection: विक्रांत मेस्सीच्या '12th फेल' नं केली बंपर कमाई; कंगनाच्या 'तेजस' ला टाकलं मागे; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन....


12th Fail And Tejas Box Office Collection: अभिनेता विक्रांत मेस्सीचा (Vikrant Massey) '12th फेल' (12th Fail) या चित्रपटाची आणि अभिनेत्री कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) 'तेजस' (Tejas) या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली होती. हे दोन्हीही चित्रपट 27 ऑक्टोबरला थिएटरमध्ये रिलीज झाले. '12th फेल' आणि  'तेजस' या चित्रपटांना रिलीज होऊन पाच दिवस झाले आहेत. जाणून घेऊयात या चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत...विक्रांत मेस्सीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन  '12th फेल'  या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती दिली आहे. ज्यानुसार,  '12th फेल'   या चित्रपटानं  शुक्रवारी (27 ऑक्टोबर) बॉक्स ऑफिसवर  1.50 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. तर शनिवारी या चित्रपटानं 2.50 कोटींचे कलेक्शन केलं आहे. तसेच रविवारी आणि सोमवारी या चित्रपटानं 3.10 आणि 1.50 कोटींचे कलेक्शन केलं आहे. आता पाचव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी हा चित्रपट 1.60 कोटी एवढी कमाई करेल, असा अंदाज लावला जात आहे. पण चार दिवसात या चित्रपटानं 8.20 कोटी एवढे कलेक्शन केलं आहे.


Indian Police Force: सिद्धार्थ मल्होत्रासोबत वेब सीरिजमध्ये झळकणार 'हा' मराठमोळा अभिनेता; फोटो शेअर करत म्हणाला, "चेस सीननंतर..."


Indian Police Force:  अभिनेता  सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) हा लवकरच  इंडियन पोलीस फोर्स (Indian Police Force)  या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सिद्धार्थसोबतच या वेब सीरिजमध्ये  शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) हे कलाकार  देखील प्रमुख भूमिका साकरणार आहे. आता  इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजमध्ये सिद्धार्थसोबत एक मराठमोळा अभिनेता झळकणार आहे. कोणता मराठमोळा अभिनेता  इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजमध्ये काम करणार आहे? याबाबत जाणून घेऊयात...


 अभिनेता आदिश वैद्य हा इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत स्क्रिन शेअर करणार आहे. नुकताच आदिशनं सिद्धार्थसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, "या स्टारबॉयसोबत काम करताना खूप आनंद झाला.  लांब धावण्याच्या चेस सीन नंतर क्लिक केलेला हा फोटो" आता इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजमध्ये आदिशचा अभिनय पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.