Suyash Tilak : मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्याबद्दल नेहमीच सर्वसामान्यांच्या मनात कुतूहल असतं. एखाद्या सेलेब्रिटी वैयक्तिक आयुष्यात कसा आहे हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता असते. कलाकारांना मायबाप रसिकप्रेक्षकांची साथ लाभल्यामुळे त्यांच्या अभिनयाचा आलेख उंच होत जात असतो. 'सेलिब्रिटी डायरी'च्या माध्यमातून जाणून घेऊयात सुयश टिळकला (Suyash Tilak) कोणता रिअॅलिटी शो करायला आवडेल ते त्याचा आवडता खाद्यपदार्थ कोणता आहे?
'मैत्री' हा शब्द ऐकल्यावर कोणाचं नाव समोर येतं?
- खूप मित्र आहेत. पण सध्या माझी बायको आयुषीचं माझी मैत्रीण आहे.
कोणता रिअॅलिटी शो करायला आवडेल?
- ट्रॅव्हल शो
पुढचा प्रोजेक्ट कोणासोबत करायला आवडेल?
- सगळ्यांसोबत काम करायचं आहे. एकाचं नाव नाही घेता येणार. पण पत्नी आयुषीसोबत काम करण्याची इच्छा आहे.
भावा-बहिणीचे किंवा मैत्रीणीचे/ मित्राचे कपडे शेअर केले आहेत का?
- नाही... पण माझ्या अनेक मित्रांनी माझे कपडे ढापले आहेत.
गॅलरीतला शेवटचा फोटो -
स्वयंपाकातील कोणते पदार्थ बनवता येतात?
- पोळी सोडल्यास सर्व प्रकारचा स्वयंपाक बनवता येतो.
आवडता खाद्यपदार्थ -
- साबुदाण्याची खिचडी
कोणत्या पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करायला आवडतं?
- लोकल ट्रेन
सध्याच्या राजकारणावर एक वाक्य -
- राजकारण हा माझा विषय नसल्याने मला यासंदर्भात आवड नाही.
मनोरंजन सृष्टीतला आदर्श?
- चार्ली चॅपलीन
सुयश टिळकबद्दल जाणून घ्या...
सुयश टिळक हा मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने नाटक, मालिका आणि सिनेमे अशा तिन्ही माध्यमांत काम केलं आहे. त्याने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अभिनयासोबत सुयश एक उत्तम फोटोग्राफरदेखील आहे. आयुषी भावेसोबत सुयश नुकताच लग्नबंधनात अडकला आहे.
सुयश टिळकच्या मालिका -
दुर्वा, अमरप्रेम, सख्या रे, छोटी मालकीण, पुढचं पाऊल, का रे दुरावा, बापमाणूस, शुभमंगल ऑनलाईन, एक घर मंतरलेलं
संबंधित बातम्या