Celebrity Diary : मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्याबद्दल नेहमीच सर्वसामान्यांच्या मनात कुतूहल असतं. एखाद्या सेलेब्रिटी वैयक्तिक आयुष्यात कसा आहे हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता असते. कलाकारांना मायबाप रसिकप्रेक्षकांची साथ लाभल्यामुळे त्यांच्या अभिनयाचा आलेख उंच होत जात असतो. 'सेलिब्रिटी डायरी'च्या माध्यमातून जाणून घेऊयात ऋतुजा बागवेच्या (Rutuja Bagwe) गॅलरीतल्या शेवटच्या फोटोपासून ते तिला कोणता रिॲलिटी शो करायला आवडेल?


'मैत्री' हा शब्द ऐकल्यावर कोणाचं नाव समोर येतं?


- अश्विनी कासार


कोणता रिअॅलिटी शो करायला आवडेल?


- डान्स रिअॅलिटी शो


पुढचा प्रोजेक्ट कोणासोबत करायला आवडेल?


- उमेश कामत


भावा-बहिणीचे किंवा मैत्रीणीचे/ मित्राचे कपडे शेअर केले आहेत का?


- हो. बाबांचेदेखील कपडे शेअर केले आहेत. 


गॅलरीतला शेवटचा फोटो




स्वयंपाकातील कोणते पदार्थ बनवता येतात?


- स्वयंपाक करणं आवडीची गोष्ट आहे. व्हेज-नॉनव्हेज, चायनीज, कॉन्टिनेंटल, भारतीय सर्व प्रकारचे पदार्थ बनवता येतात. 


आवडता खाद्यपदार्थ?


- उकडीचे मोदक


कोणत्या लोकल ट्रान्सपोर्टने प्रवास करायला आवडतं? 


ट्रेन. प्रवासादरम्यान स्टोल बांधला असेल तरी प्रवासी, चाहते डोळ्यांनी ओळखतात. 


सध्याच्या राजकारणावर एक वाक्य - 


नो कमेंट्स


मनोरंजन सृष्टीतला आदर्श?


मुक्ता बर्वे, सुबोध भावे


ऋतुजा बागवेबद्दल जाणून घ्या...


ऋतुजा बागवेने अनेक नाटकांत, मालिकांमध्ये आणि सिनेमांत काम केलं आहे. 'शहीद भाई कोतवाल' या सिनेमाच्या माध्यमातून तिने रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं आहे. तर 'एका लग्नाची तिसरी गोष्ट', 'नांदा सौख्य भरे', 'चंद्र आहे साक्षीला' या मालिकेच्या माध्यमातून तिला घराघरांत लोकप्रियता मिळाली आहे. 'अनन्या' या नाटकाने तिला नवी ओळख मिळाली. ऋतुजा बागवेचं अनन्या हे नाटक प्रचंड गाजलं. या नाटकातील अभिनयासाठी तिला अनेक पुरस्कार मिळाले असून दिग्गजांनी तिचं कौतुकदेखील केलं आहे. ऋतुजा बागवेचे फोटो शूट सोशल मीडियावर चांगलचं व्हायरल होत असतं. 


संबंधित बातम्या


Celebrity Diary : हर्षद अतकरीला आवडतात गुलाबजाम; जाणून घ्या सध्याच्या राजकारणावर तो काय म्हणाला...


Celebrity Diary : पूजा सावंतच्या मोबाईल गॅलरीतला शेवटचा स्क्रिनशॉट ते पुढचं काम तिला कोणासोबत करायचंय जाणून घ्या...