Justin Bieber : हॉलिवूडचा लोकप्रिय गायक जस्टिन बीरचे (Justin Bieber) चाहते जगभर आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी जस्टिन बीबर आजाराशी झुंज देत असल्याने चर्चेत आला होता. पण आता जस्टिन बीबर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जस्टिन बीबरने वर्ल्ड टूर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतात होणारी कॉन्सर्ट पुढे ढकलली
जस्टिन बीबरची भारतातदेखील कॉन्सर्ट होणार होती. त्यामुळे भारतातील त्याचे चाहते या कॉन्सर्टची आतुरतेने वाट पाहत होते. पण आता भारतात होणारी कॉन्सर्ट पुढे ढकलण्यात आल्याने त्याचे चाहते नाराज झाले आहेत. याआधी 2017 साली जल्टिन भारतात आला होता. जस्टिनने 'जस्टिस' या अल्बमच्या प्रमोशनसाठी जगातील अनेक देशांचा दौरा करण्याची घोषणा केली होती. पण आता प्रकृती खालावल्याने हा दौरा रद्द करण्याचा निर्णय जस्टिनने घेतला आहे.
प्रकृती बिघडल्याने वर्ल्ड टूर रद्द
प्रकृती अचानक बिघडल्याने जस्टिन बीबरने ही वर्ल्ड टूर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. जस्टिन बीबरने सोशल मीडियावर एका खास पोस्ट शेअर करत दौरा रद्द केल्याची घोषणा केली आहे. जस्टिन बीबर 'हंट सिंड्रोम' या आजाराचा सामना करत आहे.
जस्टिन बीबरची पोस्ट काय?
आजारपणामुणे वर्ल्ड टूर रद्द झाल्याने जस्टिनने लांबलचक पोस्ट शेअर करत लिहिलं आहे,"मला ब्राझीलच्या चाहत्यांना माझं गाणं ऐकवायचं होतं. पण स्टेजवर गेल्यावर अचानक मला खूप थकल्यासारखं वाटलं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की, यावेळी मी माझ्या आरोग्याकडे लक्ष द्यायला हवं. त्यामुळेच मी सध्या टूरमधून विश्रांती घेण्याचा निर्णय घेत आहे. मी लवकरच ठीक होईन. पण सध्या मला विश्रांतीची गरज आहे, यामुळे माझ्या प्रकृतीत लवकरच सुधारणा होईल"
संबंधित बातम्या