Jacqueline Fernandez :  श्रीलंकेला सध्या भीषण आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) मूळची श्रीलंकेची असल्याने आता तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रीलंकेतील परिस्थितीवर भावना व्यक्त केल्या आहेत. श्रीलंकेतील आपल्या बांधवांवर सध्या जी परिस्थिती आली आहे, ती बघवत नाही, असे म्हणत अभिनेत्रीने आपल्या भावना  व्यक्त केल्या आहेत. 


श्रीलंकेला सर्वात वाईट आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. इंधनासाठी लागणाऱ्या लांबच लांब रांगा, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा आणि तासनतास वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे श्रीलंकेतील नागरिक हैरान झाले आहेत. अशातच जॅकलीन फर्नांडिसची पोस्ट व्हायरल होत आहे.





जॅललीनने लिहिले आहे,"श्रीलंकेला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याने मला खूप वाईट वाटत आहे. मनात अनेक विचार येत आहेत. लोकांनी सध्या शांत राहावे, कोणत्याही गोष्टीला बदनाम करू नये. माझ्या देशातील नागरिकांना सध्या सहानुभूती आणि समर्थनाची गरज आहे."


संबंधित बातम्या


Sri lanka Curfew : श्रीलंकेत 36 तासांचा कर्फ्यू हटवला, नवीन मंत्रिमंडळ स्थापन होणार, पंतप्रधान करणार संबोधित


...तर आपलीही अवस्था श्रीलंकेसारखी होईल, पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चिंता व्यक्त


आणीबाणी जाहीर केल्यानंतर श्रीलंकेत निदर्शने, कर्फ्यूचे उल्लंघन केल्याप्रकरणी 600 पेक्षा जास्त जणांना अटक


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha