Allu Arjun : अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना यांचा पुष्पा हा चित्रपट चांगलाच हिट ठरला असून पुष्पाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. अल्लू अर्जुनने या चित्रपटात आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. आता चाहते पुष्पाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पुष्पा द राइजच्या जबरदस्त यशानंतर संगीतकार देवी श्री प्रसाद यांनी बहुप्रतिक्षित सिक्वेलसाठी तीन गाणी तयार केली आहेत.
पुष्पा 2 या चित्रपटासाठी आधीच तीन गाणी तयार केली आहेत. चित्रपटाचे दोन भाग करण्याचा विचार नसल्यामुळे देवी श्री प्रसाद प्रथम काही गाणी तयार केली. परंतु, निर्मात्यांनी पुष्पा चित्रपटाचे दोन भाग बनवले.
निर्माते आता पुष्पाच्या दुसऱ्या भागाचे शूटिंग सुरू करण्यास तयार आहेत. आधी तयार केलेल्या गाण्यांमध् देवी यांनी किरकोळ बदल केले आहेत. बदलानंतर सिक्वेलसाठी तीन गाणी पूर्ण केली आहेत. पुष्पाचा दुसरा भाग धमाकेदार असणार आहे. पुष्पाच्या दुसऱ्या भागात समंथाऐवजी दिशा पटनीचे आयटम साँग असणार आहे. समंथाचे ऊ अंतवा हे गाणे पुष्पाच्या पहिल्या भागात सुपरहिट झाले आहे.
'पुष्पा'मध्ये चंदन तस्कराच्या भूमिकेत दिसणारा अल्लू अर्जुन 'पुष्पा: द रुल'मध्ये अधिक तीव्र भूमिकेत दिसणार आहे. सुकुमार यांनी मैथरी मूव्ही मेकरच्या बॅनरखाली मुथमसेट्टी मीडियाच्या सहकार्याने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.