एक्स्प्लोर

Shiv Kumar Khurana passes away: चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक शिव कुमार खुराना यांचे निधन; वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

निर्माता आणि दिग्दर्शक  शिव कुमार खुराना (Shiv Kumar Khurana) यांचे निधन झाले आहे. जवळपास 35 वर्ष त्यांनी चित्रपटसृष्टीत काम केले.

Shiv Kumar Khurana passes away:  बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक  शिव कुमार खुराना (Shiv Kumar Khurana) यांचे निधन झाले आहे.  मुंबईमधील ब्रह्मकुमारी ग्लोबल रुग्णालयात वयाच्या  83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1999 मध्ये रिलीज झालेल्या जालसाज या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील त्यांनी केले. हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. 

जवळपास 35 वर्ष त्यांनी चित्रपटसृष्टीत काम केले. अशोक कुमार, संजीव कुमार, फिरोज खान, शेख मुखतियार, हेलन, जॉय मुखर्जी, विनोद मेहरा, जरीना वहाब, कमाल सदना ते कादर खान, सदाशिव अमरापूरकर, रझा मुराद आणि अनुपम खेर या कलाकारांच्या चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले. 

अभिनेते विनोद खन्ना यांना नायकाची भूमिका साकारण्याची दिली संधी
शिव कुमार खुराना  यांनी त्यांच्या चित्रपटात विनोद खन्ना यांना नायकाची भूमिका साकारण्याची पहिली संधी दिली. सुनील दत्त यांच्या होम प्रोडक्शनद्वारे निर्मित  मन का मीत या चित्रपटातून विनोद खन्ना यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. पण त्यांनी या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली होती. त्यानंतर विनोद खन्ना यांना केवळ खलनायकाच्या भूमिकेसाठीच चित्रपटांच्या ऑफर्स येत होत्या पण शिव कुमार खुराना  यांनी त्यांच्या चित्रपटात विनोद खन्ना यांना हिरोची भूमिका साकारण्याची संधी दिली. शिव कुमार खुराना यांच्या 1971 मध्ये रिलीज झालेल्या हम तुम और वो या चित्रपटात विनोद खन्ना यांनी नायकाची भूमिका साकारली. 

विंदू दारा सिंहला बॉलिवूडमध्ये केलं लाँच

शिव कुमार खुराना यांनी अनेक हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले. मिट्टी और सोना, 'फर्स्ट लव लेटर', 'बदनाम', 'बदनसीब', 'बे आबरू', 'सोने की जंजीर' आणि 'इंतकाम की आग' या चित्रपटांचे दिग्दर्शन शिव कुमार खुराना यांनी केले आहे.  'हम तुम और वो', 'दगाबाज'  आणि 'अंग से अंग लगाले'  या चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली. त्यांनीच कुस्तीपटू आणि अभिनेता दारा सिंह यांचा मुलगा विंदू दारा सिंह याला 1994 मध्ये रिलीज झालेल्या करण चित्रपटातून बॉलिवूडमध्ये लॉन्च केले. शिव कुमार खुराना यांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे.

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Entertainment News Live Updates 28 October: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

 

महत्त्वाच्या बातम्या

Madhu Kambikar Death: मराठी अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन; अनेक चित्रपटात 'लक्ष्या'च्या आईची साकारलेली भूमिका
मराठी अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन; अनेक चित्रपटात 'लक्ष्या'च्या आईची साकारलेली भूमिका
Drishyam 3 OTT Release: अजय देवगणच्या 'दृश्यम 3'ची OTT रिलीज डेट काय? कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार? विजय साळगावकरची थरारक कहाणी
अजय देवगणच्या 'दृश्यम 3'ची OTT रिलीज डेट काय? कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार? विजय साळगावकरची थरारक कहाणी
Mumbai Thane TV Actress: एक हॉटेल, रॅकेट अन् जाळ्यात अडकली TV अभिनेत्री; ठाण्यात वेश्याव्यवसायाचा भांडाफोड, रेड टाकत महिलेला अटक
एक हॉटेल, रॅकेट अन् जाळ्यात अडकली TV अभिनेत्री; ठाण्यात वेश्याव्यवसायाचा भांडाफोड, रेड टाकत महिलेला अटक
Pravin Tarde Deeol Band 2 Sucess: 'देऊळ बंद 2'ने 100 कोटींचा टप्पा कसा गाठला? प्रवीण तरडेंनी सांगितलं यशाचं गुपित, 'दृश्यम' सिनेमाबाबत म्हणाले...
'देऊळ बंद 2'ने 100 कोटींचा टप्पा कसा गाठला? प्रवीण तरडेंनी सांगितलं यशाचं गुपित, 'दृश्यम' सिनेमाबाबत म्हणाले...

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
या फोटोनं महाराष्ट्राच्या गृहखात्याचा निर्दयी चेहरा उघड केला, फडणवीस,मोदी वैगरे लोकांनी समाजाला कोणत्या नरकात ढकललं हेच दिसतं, 'तो' फोटो शेअर करत संजय राऊतांचा प्रहार
या फोटोनं महाराष्ट्राच्या गृहखात्याचा निर्दयी चेहरा उघड केला, फडणवीस,मोदी वैगरे लोकांनी समाजाला कोणत्या नरकात ढकललं हेच दिसतं, 'तो' फोटो शेअर करत संजय राऊतांचा प्रहार
Pune MPSC protest: पुण्यातील एमपीएससी आंदोलनात रात्री अचानक चक्र फिरली, पडद्यामागे काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी
पुण्यातील एमपीएससी आंदोलनात रात्री अचानक चक्र फिरली, पडद्यामागे काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी
Omraje Nimbalkar On MPSC Protest Pune: MPSC च्या आंदोलनस्थळी येताच विद्यार्थ्यांनी घातलेला गोंधळ; आता मागण्या पूर्ण होताच ओमराजे निंबाळकर म्हणाले...
MPSC च्या आंदोलनस्थळी येताच घातलेला गोंधळ; आता मागण्या पूर्ण होताच ओमराजे निंबाळकर म्हणाले...
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनाच इंडिया आघाडीच्या सुप्रीम कोर्टावरच्या मोर्चावर ऑन कॅमेरा मीडियाचा सवाल अन् एकाच वाक्यात उत्तर, दिल्लीच्या लॉ अँड ऑर्डरवर विचारताच काय म्हणाले?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनाच इंडिया आघाडीच्या सुप्रीम कोर्टावरच्या मोर्चावर ऑन कॅमेरा मीडियाचा सवाल अन् एकाच वाक्यात उत्तर, दिल्लीच्या लॉ अँड ऑर्डरवर विचारताच काय म्हणाले?
Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?
Pune News: राजगड किल्ल्यावर पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू; मालकाच्या मृत्यूनंतरही निष्ठावान जुली राहिली सोबत, स्ट्रेचरच्या सहाय्याने किल्ल्यावरून खाली आणताना मागे-मागे आली अन्...
राजगड किल्ल्यावर पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू; मालकाच्या मृत्यूनंतरही निष्ठावान जुली राहिली सोबत, स्ट्रेचरच्या सहाय्याने किल्ल्यावरून खाली आणताना मागे-मागे आली अन्...
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
Sunetra Pawar on Someshwar Sugar Factory Election Result : निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
Embed widget