Adipurush Controversy : 'आदिपुरुष' (Adipurush) या सिनेमाचा टीझर रिलीज झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. सिनेमाच्या टीझरनंतर सैफच्या भूमिकेमुळे वादाला तोंड फुटलंय. अखेर यावर दिग्दर्शक ओम राऊतने (Om Raut) मौन सोडलं आहे. आजच्या पिढीतील मुलांना रामायणाबाबत फारसं माहित नसल्याने हा सिनेमा बनवला आहे, असं या सिनेमाचा दिग्दर्शक ओम राऊत म्हणाला.


ओम राऊत म्हणाला,"आदिपुरुष' सिनेमाला नेटकरी ट्रोल करत आहेत याचं वाईट वाटत आहे. पण आश्चर्य वाटत नाही. 'आदिपुरुष' सिनेमा रुपेरी पडद्याचा विचार करुन बनवण्यात आला आहे. पण नेटकरी करत असलेलं ट्रोलिंग मी थांबवू शकत नाही. मोबाईवर पाहण्यासाठी हा सिनेमा नाही. या सिनेमाचा रुपेरी पडद्यावर प्रदर्शित करता आला असता तर युट्यूबवर प्रदर्शित केला नसता". 


ओम राऊत पुढे म्हणाला,"सध्याच्या मुलांना रामायणाबाबत जास्त माहित नाही. त्यामुळे रामायणावर आधारित हा सिनेमा बनवला आहे. जेणेकरुन सिनेमाच्या माध्यमातून सिनेरसिकांना यासंदर्भात माहिती मिळेल. हा अॅनिमेशन सिनेमा नसून लाईव्ह अॅक्शन सीन्स या सिनेमासाठी चित्रित करण्यात आले आहेत. 


हिंदू महासभा आणि भाजपकडून सैफच्या लूकवर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. 'आदिपुरुष' या सिनेमाचा टीझर सोशल मीडियावरदेखील चर्चेत आहे. 'आदिपुरुष'  या सिनेमात दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas), सैफ अली खान (Saif Ali Khan), आणि कृती सेनन (Kriti Sanon) मुख्य भूमिकेत आहेत. एकीकडे हा सिनेमा ट्रोल होत असताना दुसरीकडे या सिनेमाचं कौतुक होत आहे. या सिनेमाचा ट्रेलर चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा चांगलाच धुमाकूळ घालणार आहे. 






12 जानेवारीला 'आदिपुरुष' सिनेमागृहात घालणार धुमाकूळ


'आदिपुरुष' सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा ओम राऊतने सांभाळली आहे. तर भूषण कुमारने या सिनेमाची निर्मिती केली आहे. 12 जानेवारी 2023 रोजी 'आदिपुरुष' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हिंदी, तामिळ, मल्याळम, कन्नड या भाषांमध्ये 'आदिपुरुष' सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 


संबंधित बातम्या


Boycott Adipurush: ‘हा रावण आहे की, औरंगजेब?’, ‘आदिपुरुष’मधील सैफ अली खानचा लूक पाहून नेटकरी संतापले!


Adipurush: 'निर्मात्यांकडून मोठी चूक...'; आदिपुरुषच्या टीझरवरही केआरकेची टीका