Adipurush: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता प्रभासच्या (Prabhas) 'आदिपुरुष' (Adipurush) या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. या टीझरला काही नेटकऱ्यांची पसंती मिळाली तर काही लोक टीझरला ट्रोल करत आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन भूषण कुमार यांनी केलं आहे. आता अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमाल आर खान उर्फ केआरकेनं (KRK) आदिपुरुषच्या टीझरबाबत एक ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे.
केआरकेचं ट्वीट
केआरकेनं त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यानं लिहिलं, 'आदिपुरुषचा टीझर पाहिल्यानंतर हे कळतं की निर्माते भूषण कुमार यांच्याकडून मोठी चुक झाली आहे. त्यांनी या चित्रपटाच्या निर्मितीसाठी 450 कोटी रुपये खर्च केले. फक्त तीन तासांमध्ये रामायण प्रेक्षकांच्या समोर मांडू शकत नाही. रामायण मालिकेमध्ये रामायणामधील सर्व डिटेल्स दाखवण्यात आले आहेत. '
चित्रपटात प्रभासनं राम ही भूमिका साकारली आहे. तर कृती सेनन (Kriti Sanon) ही सिता या भूमिकेतून आणि सैफ रावण या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. लक्ष्मणाची भूमिका अभिनेता सनी सिंह साकारत आहे. 12 जानेवारी 2023 रोजी IMAX आणि 3D मध्ये 'आदिपुरुष' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 500 कोटींच्या बजेटमध्ये 'आदिपुरुष' सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. आदिपुरुष हा पौराणिक शैलीतील चित्रपट आहे हिंदी, तामिळ, मल्याळम, कन्नड या भाषांमध्ये 'आदिपुरुष' सिनेमा प्रदर्शित होणार आहे. भूषण कुमार यांच्या टी-सीरिज या कंपनीनं या चित्रपटाची निर्मिती केली आहे. याआधी ओम राऊतचा तान्हाजी हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. आता आदिपुरुष या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळेल की नाही? या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळेल.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: