Ponniyin Selvan I:  दिग्दर्शक मणिरत्न यांच्या 'पोन्नियिन सेल्वन' (Ponniyin Selvan) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. विक्रम, जयम रवी, कार्थी, तृषा आणि ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) या कलाकारांनी 'पोन्नियिन सेल्वन' या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.  लाइका प्रोडक्शन आणि मद्रास टॉकीजच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत...


जाणून घेऊयात या चित्रपटाच्या कलेक्शनबाबत... 


शुक्रवारी (30 सप्टेंबर) या चित्रपटानं 39 कोटींचे कलेक्शन केले. तर शनिवारी (1 ऑगस्ट) या चित्रपटानं 36 कोटींचे कलेक्शन केले आहे. तसेच या चित्रपटानं रविवारी (2 ऑगस्ट) या चित्रपटानं 39 कोटींची कमाई केली आहे. एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटानं जगभरातील बॉक्स ऑफिसवर 250 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी या चित्रपटानं 80 कोटींचे कलेक्शन केलं. अमेरिकेमध्ये या चित्रपटानं चार दिवसात 4.13 मिलियन डॉलर एवढी कमाई केली आहे. 






'पोन्नियिन सेल्वन' हा सिनेमा दोन भागांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. चित्रपटाचा दुसरा भाग हा नऊ महिन्यांनी रिलीज केला जाणार आहे, असं म्हटलं जात आहे. या चित्रपटाचा साउंडट्रॅक ए आर रहमानने संगीतबद्ध केला आहे.  30 सप्टेंबर रोजी हा चित्रपट रिलीज झाला होता. हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज झाला. 500 कोटींच्या बजेटमध्ये या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.  लाइका प्रोडक्शन आणि मद्रास टॉकीजच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. ऐश्वर्या राय बच्चन पोन्नियिन सेल्वनमध्ये राणी नंदिनीची भूमिका साकारत आहे. तर अभिनेता चियान विक्रम शोभिता धूलिपाला आणि जयम रवी हे कलाकार देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: