एक्स्प्लोर

Film Legend Dilip Kumar : नजर... पॉज आणि बरंच काही...

दुर्दैवाने मंगळवारी सकाळी दिलीप कुमार यांच्या निधनाची बातमी आली आणि शिक्षणाचं, अभिनयाचं, बुद्धीचं एक विद्यापीठ शांत झालं.  

Dilip Kumar Passes Away : दिलीप कुमार यांच्या अभिनयाची आपली अशी एक शैली होती. त्यांना खरंतर ट्रॅजेडी किंग म्हटलं जायचं. पण त्याही पलिकडे दिलीपकुमार हे रसायन होतं. कारण, भूमिका, संवाद समजून घेऊन त्यांची संवादफेक करण्याकडे त्यांचा कल होता. त्यांच्या चित्रपटातले कोणतेही संवाद काढून बघितले तर लक्षात येतं, विरामचिन्हांचा प्रभावी वापर या अभिनेत्याने केला. 
 
संवादांमध्ये विरामचिन्ह फार महत्वाची असतात. स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह, अर्धविराम इतकं की वाक्यापुढे असलेले तीन डॉटही दिलीपकुमार यांनी आपल्या संवादांतून उतरवले. कारण, शब्दांचा, वाक्यांचा आणि एकूण परिस्थितीचा पुरेसा अंदाज घेऊन त्याची संवादफेक असेल. म्हणूनच त्यांचे संवाद सुपरहिट झाले. दिलीप कुमार यांचा काही दिवसांपूर्वी एक फुटपाथ नावाच्या सिनेमाचा संवाद खूप व्हायरल झाला होता. खरंतर गरीब कामगारांविषयीचा तो संवाद होता. त्या संवादात नायक म्हणून दिलीपकुमार यांना आदळआपट करता येत होतीच. पण तसं त्यांनी न करता अत्यंत संयतपणे आपली सावदफेक कली. म्हणूनच अत्यंत शांतपणे कोणतेही आक्रमक आविर्भाव नसतानाही त्यांचे संवाद प्रभाव ठरतात. आणि हीपेक्षा महत्वाची बाब अशी की त्या संवादांमध्ये असलेली शांतता. ज्याला आपण पॉज म्हणून ओळखतो तो अंगावर येतो. 
 
अभिनय करताना कॅमेरासमोर कसं उभं रहायचं, तो करताना आपल्या शारीरीक हालचाली कशा ठेवायच्या याची पुरेशी कल्पना दिलीप कुमार यांना होती. म्हणून दिलीप कुमार यांना पाहून अभिनयाचे धडे गिरवणारे अनेक आहेत. अनेक कलाकारांनी दिलीप कुमार गेल्यानंतर ट्विट करताना दिलीपकुमार हे एक विद्यापीठ असल्याचं म्हटलं आहे. आपल्या हातांचा वापर ते फारच सुरेख पद्धतीने करत असत. त्याशिवाय नजरेतून बोलणारा हा नायक होता. अनेक मराठी कलाकारांनीही याबद्दल वेदना व्यक्ते केली आहे. सुरेश वाडकर, मोहन आगाशे, मकरंद देशपांडे असे अनेक. 
 
गेल्या काही वर्षापासून दिलीपकुमार आजारी आहेत याची कल्पना सगळ्यांनाच होती. पण दिलीपकुमार आजून हयात आहेत यातच सगळ आलं होत. पण आता आजच्या बातमीने मात्र सर्वांना धक्का दिला. कारण, दिलीप कुमार यातूनही बरे होतील असं अनेकांना वाटत होत. पण दुर्दैवाने मंगळवारी सकाळी ही बातमी आली. शिक्षणाचं.. अभिनयाचं.. बुद्धीचं एक विद्यापीठ आज शांत झालं.
 
महत्त्वाच्या इतर बातम्या :   
 
 

महत्त्वाच्या बातम्या

Upendra Limaye on Animal: 'Sandeep Reddy Vanga यांना तुम्हाला भेटायचंय'; उपेंद्र लिमयेंनी 'Animal'साठी दिलेला थेट नकार, मग होकार कसा दिला?
'Sandeep Reddy Vanga यांना तुम्हाला भेटायचंय'; उपेंद्र लिमयेंनी 'Animal'साठी दिलेला थेट नकार, मग होकार कसा दिला?
Tusshar Kapoor: टायगर श्रॉफनंतर आणखी एक बॉलिवूड अभिनेता लॉरेन्स बिश्नोई गँगच्या रडारवर? थेट धमकीचा फोन, '5 कोटी दे नाहीतर....'
टायगर श्रॉफनंतर आणखी एक बॉलिवूड अभिनेता लॉरेन्स बिश्नोई गँगच्या रडारवर? थेट धमकीचा फोन, '5 कोटी दे नाहीतर....'
Dia Mirza Reaction On Diwali Controversy: दिया मिर्झा प्रदूषण मुक्त दिवाळीच्या व्हिडीओनंतर जबरदस्त ट्रोल; आता म्हणाली, 'माझं काय चुकलं? सांगा...'
दिया मिर्झा प्रदूषण मुक्त दिवाळीच्या व्हिडीओनंतर जबरदस्त ट्रोल; आता म्हणाली, 'माझं काय चुकलं? सांगा...'
Sachin Pilgaonkar on Marathi Movie: 'मुंबईपेक्षा पुण्यात मराठी चित्रपट जास्त चालतो'; मराठी चित्रपटांबाबत सचिन पिळगावकर नेमकं काय म्हणाले?
'मुंबईपेक्षा पुण्यात मराठी चित्रपट जास्त चालतो'; मराठी चित्रपटांबाबत सचिन पिळगावकर नेमकं काय म्हणाले?

व्हिडीओ

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra District bank Election Result 2026: जिल्हा बँक निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी; सांगली, सातारा, नगरमध्ये कोण-कोण जिंकलं?
जिल्हा बँक निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी; सांगली, सातारा, नगरमध्ये कोण-कोण जिंकलं?
Rain Update: महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं सावट; 'मुरासू' चक्रीवादळामुळे कोकण, मराठवाडा अन् मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्याची शक्यता, हवामान विभागाचा अलर्ट
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं सावट; 'मुरासू' चक्रीवादळामुळे कोकण, मराठवाडा अन् मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्याची शक्यता, हवामान विभागाचा अलर्ट
Sangli District Central Cooperative Bank election : गोपीचंद पडळकरांनी विजयाचा गुलाल उधळलाच, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विजय, किती मतं मिळाली?
गोपीचंद पडळकरांनी विजयाचा गुलाल उधळलाच, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विजय, किती मतं मिळाली?
Gokul Chairman Election 2026: गोकुळबाबत सतेज पाटलांना ज्याची भीती होती तेच घडलं! महायुतीची चक्रावणारी खेळी, फडणवीसांना विचारुन चौथं नाव ठरणार
गोकुळबाबत सतेज पाटलांना ज्याची भीती होती तेच घडलं! महायुतीची चक्रावणारी खेळी, फडणवीसांना विचारुन चौथं नाव ठरणार
Payal Pawar Zhambre Death Case Pune: दुष्काळ सुरुय, थोडा वेळ द्या ना..., पायलच्या मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं?, पुण्यातील थरकाप उडवणारी घटना
दुष्काळ सुरुय, थोडा वेळ द्या ना..., पायलच्या मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं?, पुण्यातील थरकाप उडवणारी घटना
Sangli News: सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत 6 जागांची मतमोजणी सुरू; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, गोपीचंद पडळकरांसह 'हे' नेते रिंगणात
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत 6 जागांची मतमोजणी सुरू; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, गोपीचंद पडळकरांसह 'हे' नेते रिंगणात
NCP Crisis Parth Pawar: अमित शाहांसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची मोठी मागणी, पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर नाराजी, आता संध्याकाळी देवगिरी बंगल्यावर काय घडणार?
अमित शाहांसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची मोठी मागणी, पार्थ पवारांबाबत नाराजी, आता संध्याकाळी देवगिरी बंगल्यावर काय घडणार?
Satara District Bank Election Result 2026: अवघ्या दीड तासात सातारा, सांगली जिल्हा बँक निवडणुकीचे धडाधड निकाल, कोण-कोण जिंकलं, महायुती की मविआ कोणाचं पारडं जड?
अवघ्या दीड तासात सातारा, सांगली जिल्हा बँक निवडणुकीचे धडाधड निकाल, कोण-कोण जिंकलं, महायुती की मविआ कोणाचं पारडं जड?
Embed widget