एक्स्प्लोर
'धोनीः दी अनटोल्ड स्टोरी'चं नवं पोस्टर रिलीज
नवी दिल्लीः टीम इंडियाचा वन डे कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा बायोपिक ‘धोनीः दी अनटोल्ड स्टोरी’ सिनेमाचं नवीन पोस्टर रिलीज झालं आहे. यापूर्वीही दोन पोस्टर रिलीज करण्यात आले होते. या पोस्टरमध्ये धोनीच्या आयुष्यातील संघर्षाचा कोलाज दिसत आहे.
फॉक्स स्टार सिनेमाने ट्विटरवर हे पोस्टर शेअर केलं आहे. हा सिनेमा 30 सप्टेंबर रोजी हिंदीसह, मराठी, तामीळ, तेलुगु भाषेत देशभरात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात धोनीच्या भूमिकेत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत दिसणार आहे.
https://twitter.com/foxstarhindi/status/767656130579406848
निरज पांडे दिग्दर्शित ‘धोनीः दी अनटोल्ड स्टोरी’ सिनेमाची उत्सुकता वाढतच चालली आहे. या सिनेमाची निर्मिती फॉक्स स्टार स्टुडिओद्वारे केली आहे. सुशांत सिंह राजपूतने धोनीची भूमिका निभावण्यासाठी मोठी मेहनत घेतली आहे. बॉलिवूडच्या कलाकारांची भलीमोठी फौज या सिनेमात पाहायला मिळणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement