एक्स्प्लोर
ढाका हल्ल्यातील दहशतवाद्याचं श्रद्धा कपूरशी शेकहँड
नवी दिल्ली / ढाका : बांगलादेशची राजधानी ढाक्यातील हल्ल्यामधील दहशतवादी निबरास इस्लाम बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा चाहता होता. श्रद्धा कपूरला भेटून शेकहँड केल्याचा एक व्हिडीओ निबरासने ‘फिलिंग परफेक्ट’ असे म्हणत फेसबुकवर पोस्ट केला होता.
‘फिलिंग परफेक्ट’
8 जून 2015 रोजी सकाळी चार वाजता निबरासने श्रद्धा कपूरसोबतचा व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट केला होता. 20 वर्षीय दहशतवादी निबरासने व्हिडीओ शेअर करुन लिहिलं आहे, ‘फिलिंग परफेक्ट’. या पोस्टला ‘Shraddha kapoor you beauty!! The moment when she holds my hand.’ असं कॅप्शन दिलं आहे.
व्हिडीओ पाहिल्यानंतर स्पष्ट दिसतं की, श्रद्धा-निबरासची ही वैयक्तिक भेट नव्हती. एका कार्यक्रमादरम्यानचा हा व्हिडीओ आहे.
निबरास सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असायचा. शिवाय, त्याची अनेक भाषांवर चांगली पकड होती, अशीही माहिती मिळते आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement