Delivery Boy : 'डिलिव्हरी बॉय'ची (Delivery Boy) घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाच्या नावावरुनच प्रेक्षकांची सिनेमाबाबतची उत्सुकता वाढली आहे. अशातच आता या सिनेमाचं नवं पोस्टर आऊट झालं आहे.


'डिलिव्हरी बॉय'च्या नवीन  पोस्टरने वेधले प्रेक्षकांचे लक्ष


मोहसीन खान दिग्दर्शित 'डिलिव्हरी बॉय' या सिनेमाचे एक नवीन गंमतीशीर पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. पोस्टरमध्ये प्रथमेश परबच्या (Prathamesh Parab) हातातील गिफ्टबॉक्समध्ये एक गोंडस बाळ दिसत आहे. त्याच्या बाजूला पृथ्विक प्रताप (Prithvik Pratap) आणि डॅाक्टरच्या वेषात अंकिता लांडे पाटीलही (Ankita Patil) दिसत आहे. त्यामुळे आता प्रथमेश या बाळांची डिलिव्हरी करणार का, असा प्रश्न अनेकांना पडला असेल.


'डिलिव्हरी बॉय' कधी रिलीज होणार? (Delivery Boy Release Date) 


'डिलिव्हरी बॉय' हा बहुचर्चित सिनेमा 9 फेब्रुवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राम खाटमोडे आणि विनोद वणवे यांनी या सिनेमाचं लेखन केलं आहे. मोहसीन खानने दिग्ददर्शनाची धुरा सांभाळली आहे. प्रथमेश परब आणि पृथ्विक प्रताप यांच्या सिनेमाची प्रेक्षकांना आता उत्सुकता आहे.






सरोगसीसारख्या नाजूक विषयावर भाष्य करणारा 'डिलिव्हरी बॉय'


'डिलिव्हरी बॉय'बद्दल बोलताना दिग्दर्शक मोहसीन खान म्हणाले,"डिलिव्हरी बॉय'च्या माध्यमातून एक वेगळा विषय मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. सरोगसीसारख्या नाजूक विषयावर भाष्य करणाऱ्या आमच्या या सिनेमातून प्रेक्षकांना संदेश देण्याचा एक प्रयत्न आहे. मात्र हे करताना या विषयाचे गांभीर्य  जपत आम्ही त्याला विनोदाची साथ दिली आहे. 


'डिलिव्हरी बॉय'च्या घोषणेपासूनच प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दल उत्सुकता लागून राहिली होती. त्यात काही दिवसांपूर्वी या सिनेमाचे एक भन्नाट पोस्टर सोशल मीडियावर झळकले. त्यानंतर प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा एक धमाकेदार टीझर आऊट करण्यात आला. टीझरमध्ये प्रथमेश परब आणि पृथ्वीक प्रताप गावातील काही महिलांना 'सरोगसी'साठी तयार करताना दिसत असून यातून होणारा कल्लोळ आपल्याला चित्रपटात दिसणार आहे.


प्रथमेश परबचा वेगळा अंदाज


आता हे दोघे गावातील महिलांना सरोगसीसाठी का तयार करत आहेत, याचे उत्तर मात्र प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहे. या चित्रपटात प्रथमेश आणि पृथ्वीक बरोबर अंकिता लांडेही पाटीलही प्रमुख भूमिकेत आहे. 'डिलिव्हरी बॉय'मधून प्रथमेश परब एका वेगळ्याच लूकमध्ये प्रेक्षकांसमोर येणार असून त्याचा हा नवा अंदाज चाहत्यांना नक्कीच आवडेल.


संबंधित बातम्या


Delivery Boy Teaser Out : 'डिलिव्हरी बॉय' चा धमाकेदार टीझर रिलीज; प्रथमेश परब आणि पृथ्वी प्रतापचा कॉमेडी अंदाज!