Sushant Singh Rajput : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा (Sushant Singh Rajput) 'दिल बेचारा' (Dil Bechara) हा शेवटचा सिनेमा ठरला. मुकेश छाब्रा (Mukesh Chhabra) यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. आता सुशांतच्या निधनानंतर या सिनेमाचा (Dil Bechara 2) सीक्वेल येणार आहे.  


'दिल बेचारा 2' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती दिग्दर्शक मुकेश छाब्रा यांनी ट्वीट करत दिली आहे. 'दिल बेचारा' हा सिनेमा जुलै 2020 मध्ये ओटीटीवर रिलीज झाला होता. जॉन ग्रीन यांच्या 'द फॉल्ट इन आवर स्टार्स' या पुस्तकावर आधारित हा सिनेमा होता. या सिनेमात संजना सांघी सुशांतसोबत स्क्रीन शेअर करताना दिसली होती. 


सुशांत सिंह राजपूतचे चाहते भावूक


14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूतच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. सुशांतच्या निधनानंतर त्याचा 'दिल बेचारा' हा सिनेमा ओटीटीवर रिलीज करण्यात आला होता. त्यामुळे हा सिनेमा पाहताना सुशांतच्या चाहत्यांना अश्रू अनावर झाले होते. आता पुन्हा एकदा या सिनेमाच्या सीक्वेलची घोषणा झाल्याने चाहते भावूक झाले आहेत.


सुशांत सिंह राजपूतची जागा कोण घेणार? 


'दिल बेचारा 2'ची घोषणा करत दिग्दर्शक मुकेश छाब्रा यांनी ट्वीट केलं आहे,"Dil Bechara 2". या ट्वीटवर सुशांतच्या चाहत्यांनी कमेंट्स करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मुकेश छाब्रा यांनी आपल्या ट्वीटमध्ये सिनेमाचं कथानक किंवा कास्टिंगबद्दल भाष्य केलेलं नाही. त्यामुळे सुशांत सिंह राजपूतची जागा कोण घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.






'दिल बेचारा'च्या नावे अनेक रेकॉर्ड्स


'दिल बेचारा' या सिनेमात सुशांत सिंह राजपूतला शेवटचं पाहताना चाहते भावूक झाले होते. डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा रिलीज झाला होता. आयएमडीबी रेटिंगमध्ये या सिनेमाला 10 पैकी 9.8 रेटिंग मिळाले आहेत. 24 तासाच्या आत या सिनेमाला 95 मिलियन व्ह्यूज मिळाले होते. सिनेमासह ट्रेलरनेही रेकॉर्ड केला होता. ट्रेलरला 24 तासांत 24 मिलियन व्ह्यूज आणि 5.2 मिलियन लाईक्स मिळाले होते. सुशांत सिंह राजपूतसह सैफ अली खान आणि नवनिर्मित संजना सांघी या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत होते. 2019 मध्ये या सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालं आहे. आता या सिनेमाच्या सीक्वेलची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.


संबंधित बातम्या


Bigg Boss 17 : अंकिता लोखंडेला सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीचा पाठिंबा; म्हणाली,"तू कमाल आहेस"