Rohit Pawar on 12th Fail Movie : '12 वी फेल' (12th Fail) हा सिनेमा सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर ओटीटीवर रिलीज करण्यात आला आहे. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली. आता ओटीटीवरदेखील हा सिनेमा गाजत आहे. 12 वी फेल (12th Fail) या सिनेमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. आमदार रोहित पवार यांनीदेखील हा सिनेमा पाहिल्यानंतर खास पोस्ट लिहिली आहे.


'12 वी फेल' या सिनेमासंदर्भात येणाऱ्या प्रतिक्रिया खूपच सकारात्मक आहेत. विधु विनोद चोप्रा (Vidhu Vinod Chopra) दिग्दर्शित या सिनेमाचं बॉलिवूडकरांनीदेखील कौतुक केलं आहे. आता राजकीय क्षेत्रातील मंडळींनादेखील या सिनेमाने भुरळ घातली आहे. राष्ट्रवादीचे आमदार युवा नेते रोहित पवार (Rohit Pawar on 12th Fail) यांनीदेखील '12 th Fail) हा सिनेमा पाहिला आहे. सिनेमा पाहून त्यांनी दिलेली प्रतिक्रिया सध्या चर्चेत आहे. 


रोहित पवार यांची पोस्ट काय? (Rohit Pawar Post)


'12th Fail' पाहिल्यानंतर रोहित पवार यांनी खास पोस्ट शेअर करत लिहिलं आहे,"सामान्य कुटुंबातील मुलांना कसा संघर्ष करावा लागतो, किती कष्ट घ्यावे लागतात हे दाखवणारा सद्यस्थितीवरचा #12thFailMovie हा #OTT प्लॅटफॉर्मवर पाहिला. सामान्य कुटुंबातील मुलांचा हा संघर्ष प्रत्यक्ष दिसत नसला तरी किमान सिनेमात तरी पाहून कळेल, म्हणून सरकारमध्ये बसलेल्या सर्वांनीच हा सिनेमा पाहिला पाहिजे... तरच ते मुलांबाबत #serious होतील, अशी अपेक्षा करू". 


रोहित पवार (NCP Rohit Pawar News) यांनी '12 वी फेल' (12th Fail) पाहिल्यानंतर सिनेमाबाबतचे आपले विचार व्यक्त केले आहेत. '12 वी फेल' सिनेमाचा आधार घेत त्यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य करण्याचा प्रयत्न केला आहे.


रोहित पवार यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा कमेंट्सचा वर्षाव


रोहित पवार यांची '12 वी फेल' या सिनेमाविषयीची पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. असे कितीतरी मनोज या सिस्टीमचे बळी गेलेत, पण सिनेमा एकदम बेस्ट, सर्व राजकीय नेत्यांनी आणि त्यांच्या मुलांनी हा सिनेमा जरुर बघावा कारण त्यांना सामान्य कुटुंबातील मुलांचा संघर्ष काय असतो हे माहित नसतं., वास्तविकता दाखवणारा सिनेमा, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 


'12 वी फेल' सिनेमाबाबत जाणून घ्या... (12th Fail Movie Details)


'12 वी फेल' या सिनेमात विक्रांत मेस्सी (Vikrant Messey) मुख्य भूमिकेत आहे. विधू विनोद चोप्रा (Vidhu Vinod Chopra) यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. कमी बजेटमध्ये निर्मिती करण्यात आलेल्या या सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे. अनुराग पाठक यांच्या पुस्तावर आधारित हा सिनेमा आहे. आयपीएस मनोज कुमार यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे. 


संबंधित बातम्या


12th Fail : बॉक्स ऑफिस गाजवलेला '12 वी फेल' ऑस्करच्या शर्यतीत! विक्रांत मेस्सीने दिली माहिती