Delivery Boy Teaser Out: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारा अभिनेता पृथ्वी प्रताप (Prithvi Pratap) यांचा 'डिलिव्हरी बॉय' (Delivery Boy) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं पोस्टर काही दिवसांपूर्वी रिलीज झालं होतं. आता या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरला नेटकऱ्यांनी पसंती मिळत आहे. 


'डिलिव्हरी बॉय' या चित्रपटाच्या टीझरच्या सुरुवातीला प्रथमेश आणि पृथ्वी हे दोघे गावातील एका घराच्या बाहेर जाऊन बसताना दिसत आहेत. त्यानंतर प्रथमेश एका माणासाला सांगतो, "मी वहिनींसाठी एक स्पेशल काम आणलं आहे. ज्या बायांना मुलं होत नाहीत, अशा बायांची मुलं वहिनींच्या पोटात वाढवायचं" प्रथमेश हा सरोगसीबद्दल बोलतं. त्याचं बोलणं ऐकून गावातील लोक आश्चर्यचकित होतात. काही लोक पृथ्वीक आणि प्रथमेशला मारायला लागतात. 


प्रथमेशनं सोशल मीडियावर 'डिलिव्हरी बॉय' या चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. या टीझरला त्यानं कॅप्शन दिलं, "दोन अतरंगी मित्र आणि एक हुशार डॉक्टर, तिघे मिळून करायला येतायत कॉमेडी आणि एंटरटेनमेंटची डिलिव्हरी! सादर आहे 9 फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या 'डिलिव्हरी बॉय' चा हा धम्माल टीझर!"


पाहा टीझर






सिनेपोलिस आणि दीपा नायक प्रस्तुत, लुसिया एंटरटेनमेंट प्रोडक्शन्स निर्मित 'डिलिव्हरी बॉय' या चित्रपटाचे मोहसीन खान दिग्दर्शक आहेत. हा चित्रपट  9 फेब्रुवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात  अंकिता लांडे पाटील ,प्रथमेश परब आणि पृथ्वीक प्रताप हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 


टाईमपास,ढिशक्यांव, टकाटक आणि एक नंबर या चित्रपटांमधून प्रथमेश प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता त्याच्या 'डिलिव्हरी बॉय'  या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.






वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Delivery Boy : एंटरटेनमेंटची डिलिव्हरी करायला येतोय 'डिलिव्हरी बॉय'! प्रथमेश परब मुख्य भूमिकेत; पोस्टर आऊट