मुंबई : मेघना गुलजार दिग्दर्शित 'छपाक' चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदुकोण अॅसिड हल्ला पीडितेच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील दीपिकाचा फर्स्ट लूक जाहीर करण्यात आला आहे.

अॅसिड हल्ला पीडिता लक्ष्मी अगरवालवर आधारित 'छपाक' चित्रपटात दीपिका आणि विक्रांत मस्सी मुख्य भूमिकेत आहेत. मालती असं दीपिकाच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे.

अॅसिड हल्ला पीडिता लक्ष्मी अगरवाल यांचं सामाजिक क्षेत्रातील योगदानही उल्लेखनीय आहे.स्थानिक दुकानांमध्ये अॅसिड आणि केमिकल्सच्या विक्रीविरोधात कायदा करण्यात अगरवाल यांचा मोलाचा वाटा आहे.


चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून 10 जानेवारी 2020 रोजी 'छपाक' प्रदर्शित होईल. फॉक्स स्टार स्टुडिओ, दीपिका पदुकोणचा 'के ए एन्टरटेनमेंट', मेघना गुलजारच्या 'मृगा फिल्म्स'नी या सिनेमाची निर्मिती केली आहे.

'छपाक' चित्रपटाद्वारे दीपिका पदुकोण निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. विशेष म्हणजे लग्नानंतर दीपिकाचा हा पहिलाच चित्रपट आहे.