मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सिनेमा आणि राजकारणाचं नातं उलगडण्याचा हा प्रयत्न आहे. राजकारण, समाजकारण आणि हिंदी सिनेमांचा विचार केल्यास अशोक कुमार यांच्या संग्राम चित्रपटापासूनच्या आठवणी जाग्या होतात. काही राजकीय नेत्यांनी काही चित्रपटांवर घेतलेले आक्षेप नेमके कोणत्या विषयावर होते, ब्लॅक अँड व्हाईट जमान्यापासून हिंदी तसेच मराठी चित्रपटांमध्ये विषय घेण्यात आलेत.
VIDEO | राजकारण आणि सिनेमा | फ्लॅशबॅक | एबीपी माझा
किस्सा कुर्सी का हा चर्चेत राहिलेला चित्रपटही यामध्ये घेण्यात आलाय. ज्यात एक गाव बारा भानगडीसारखा चित्रपटही आहे. तर संथ वाहते कृष्णामाई चित्रपटात जलसंपदा, पाणी प्रश्न या विषयांना हात घालण्यात आलाय. यांसारखे अनेक चित्रपटात राजकारण, समाजकारण यांविषयी भाष्य केलं आहे.