एक्स्प्लोर
दीपिकाचा एक्स निहार पांड्या आणि गायिका निती मोहन लग्न करणार?
पुढच्या वर्षी म्हणजेच फेब्रुवारी 2019 मध्ये निहार पांड्या आणि निती मोहन लग्न करणार असल्याची माहिती आहे.

मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह अवघ्या काही दिवसात लगीनगाठ बांधणार आहेत. त्याचवेळी दीपिकाचा कथित एक्स-बॉयफ्रेण्ड निहार पांड्या आणि प्रसिद्ध पार्श्वगायिका निती मोहनही विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. पुढच्या वर्षी म्हणजेच फेब्रुवारी 2019 मध्ये निहार पांड्या आणि निती मोहन लग्न करणार असल्याची माहिती आहे. गेल्या चार वर्षांपासून दोघांचं अफेअर आहे. 'पिंकविला' वेबसाईटने निहार-निती यांचं शुभमंगल ठरल्याचं वृत्त दिलं आहे. कंगनाची मुख्य भूमिका असलेल्या 'मनिकर्णिका' चित्रपटातून निहार बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 'मनिकर्णिका' सिनेमा 25 जानेवारी 2019 ला प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर निहार लगीनघाईला सुरुवात करेल.
स्ट्रगलिंगच्या काळात दीपिका आणि निहार एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जातं. मात्र त्यानंतर दोघांचे मार्ग वेगळे झाले. दीपिकाने 'ओम शांती ओम' चित्रपटातून 2007 साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
स्ट्रगलिंगच्या काळात दीपिका आणि निहार एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जातं. मात्र त्यानंतर दोघांचे मार्ग वेगळे झाले. दीपिकाने 'ओम शांती ओम' चित्रपटातून 2007 साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आणखी वाचा























