Deepika Padukone As Lady Singham:  बॉलीवूड अभिनेत्री हीने काहीच दिवसांपूर्वी तिची प्रेग्नंसी जाहीर केली. त्यानंतर तिने 'सिंघम अगेन' (Singham Again) या सिनेमाच्या शुटींगला सुरुवात केली. तिच्या बेबीबंपसह सेटवरचे दीपिकाचे (Deepika Padukone) फोटोही व्हायरल झाले होते. रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम अगेन' (Singham Again) या चित्रपटात दीपिका पदुकोण 'लेडी सिंघम'च्या भूमिकेत दिसणार आहे. मागीलवर्षात म्हणजेच 2023 मध्ये या सिनेमातील तिचा एक लूकही समोर आला होता. 


येत्या सप्टेंबर महिन्यात दीपिका आणि रणवीर आईबाबा होणार आहेत. त्याआधी दीपिका तिच्या कामावर एकाग्र झाल्याचं पाहायला मिळतंय. नुकतच दीपिकाने तिचा लेडी सिंघम लूकमधला एका फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. त्याला दीपिकाने दिलेल्या कॅप्शननेही साऱ्यांचच लक्ष वेधून घेतलं आहे. 


दीपिकाचा फोटो चर्चेत


अभिनेत्री दीपिका पादुकोण हीने तिच्या सोशल मीडियावरुन तिच्या या लेडी सिंघमचा फोटो शेअर केला आहे. या सिनेमात दीपिकाने काही अॅक्शन सिनही शूट केले आहेत. नुकतच दीपिकाने शेअर केलेल्या फोटोला तिने #लेडीसिंघम #शक्तीशेट्टी असं कॅप्शन दिलं आहे. त्याचप्रमाणे तिने याला सिंघमचं टायटल साँगही जोडलंय. दीपिकाच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत तिच्यावर कौतुकांचा वर्षाव केला आहे. एकाने कमेंट करत म्हटलं की, प्रत्येक भूमिकेत ही आई कशी इतकी सुंदर दिसू शकते. 






सिंघम अगेन ची शूटिंग सुरु


सिंघम अगेनमध्ये बाजीरावच्या भूमिकेत पुन्हा एकदा अजय देवगणची दमदार ॲक्टिंग पाहायला मिळणार असून त्याच्यासोबत बेबो करीना कपूरची केमिस्ट्री चाहत्यांना पाहता येणार आहे. त्यासोबतच रणवीर सिंह, अक्षय कुमार, विकी कौशल, टायगर श्रॉफ मल्टीस्टारकास्ट पाहायला मिळेल. सध्या चित्रपटाची शूटींग सुरु आहे.


सिंघम अगेन चित्रपट 15 ऑगस्ट 2024 ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अजय देवगण पु्न्हा एकदा बाजीराव सिंघमच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटासाठी 250 कोटी रुपयांचं बजेट असल्याचं बोललं जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सिंघम 3 चित्रपटासाठी अजय देवगणने चित्रपटाच्या कमाईचा 20 टक्के हिस्सा घेणार आहे. ही रक्कम सुमारे 50-60 कोटी रुपये आहे.


ही बातमी वाचा : 


Gulabi Sadi song in FilmFare : 'फिल्मफेअर'च्या मंचावर 'गुलाबी साडीची' हवा, मराठी कलाकारांनी धरला ठेका;पाहा व्हिडिओ