Kapil Sharma Cafe Firing News : कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार झाला आहे. काही दिवसांपूर्वीच कपिल शर्माने कॅनडामध्ये त्यांच्या कॅफेचं उद्घाटन केलं होतं. कपिलने आपल्या पत्नी गिन्नी चतरथसोबत मिळून कॅनडामध्ये एक भव्य रेस्टॉरंट सुरू केलं आहे. दोघांनी ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील सरे (Surrey) शहरात ‘कॅप्स कॅफे’ सुरू केलं होतं. या कॅफेचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 

हरजीत सिंग लाडीने घेतली गोळीबाराची जबाबदारी

बीकेआय (बब्बर खालसा इंटरनॅशनल) या संघटनेचा कार्यकर्ता आणि भारताच्या एनआयएकडून सर्वाधिक शोधात असलेला दहशतवादी हरजीत सिंग लाडी याने कपिल शर्माच्या काही वक्तव्यांचा हवाला देत या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे.

वेगाने व्हायरल होणारा व्हिडीओ

कपिल शर्माचा हा कॅफे कॅनडाच्या सरे भागात आहे. त्यांनी नुकतेच या कॅफेचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन केले होते. उद्घाटनावेळी मोठ्या प्रमाणात गर्दीही झाली होती. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये रात्रीच्या वेळी एक कार कॅफेजवळ येते आणि कॅफेच्या काचांवर गोळीबार करताना दिसते. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

या संघटनेने घेतली जबाबदारी

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेची जबाबदारी एका कट्टरपंथी संघटनेने घेतली आहे. आता या प्रकरणात पुढे काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कथित व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत असून, त्यामध्ये एका व्यक्तीने वाहनाच्या आतून पिस्तुलातून किमान नऊ गोळ्या झाडताना दिसत आहे. हरजीत सिंग लड्डी, जो पंजाबच्या नवांशहर येथील रहिवासी आहे, हा बब्बर खालसा इंटरनॅशनल (BKI) या संघटनेचा कार्यकर्ता असून, तो राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) सर्वाधिक शोधात असलेल्या दहशतवाद्यांच्या यादीत आहे.

राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ने गेल्या वर्षी हरजीत सिंग लड्डी याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं. त्याचप्रमाणे, पाकिस्तानस्थित BKI चा प्रमुख वधवा सिंग आणि इतर चार जणांविरुद्धही आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. हे प्रकरण पंजाबमध्ये हिंदू संघटनेचे नेते विश्व हिंदू परिषदचे विकस प्रभाकर ऊर्फ विकास बग्गा यांच्या हत्येशी संबंधित आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Salman Khan Transformation For Movie Battle Of Galwan: वजन घटलं, फक्त एक चमचा भात खाऊन जगतोय भाईजान; दारुही सोडली, सलमान खानला नेमकं झालंय काय?

Bollywood Actress Struggle Life: कधीकाळी ऐश्वर्या रायला द्यायची टक्कर, आता ग्लॅमरस जग सोडून जगतेय सन्यासाचं जीवन, बौद्ध भिक्षू बनलीय 'ही' अभिनेत्री