Lapandav Star Pravah Serial Track: स्टार प्रवाहवर (Star Pravah) नवनव्या मालिकांचा प्रवाह अखंड सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच भेटीला आलेली 'हळद रुसली कुंकू हसलं' मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत असतानाच आता 'लपंडाव' ही नवीकोरी मालिका स्टार प्रवाहवर लवकरच सुरू होणार आहे. 'आई कुठे काय करते' मालिकेतील संजना म्हणजेच, लोकप्रिय अभिनेत्री रुपाली भोसले (Actress Rupali Bhosale) एका छोट्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मालिका विश्वात दमदार पुनरागमन करणार आहे. यावेळी संजना नाही तर सरकार बनून ती पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची छाप पाडणार आहे. 

Continues below advertisement





या मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना रुपाली म्हणाली, " 'लपंडाव' मालिकेत तेजस्विनी कामत हे पात्र मी साकारत आहे, जिला सगळे आदरानं सरकार असं म्हणतात. प्रेम आणि नात्यांपेक्षा तिच्या लेखी पैशांना जास्त महत्त्व आहे. घरात आणि ऑफिसमध्येही तेजस्विनीचच राज्य आहे. आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा ही भूमिका नक्कीच वेगळी आणि आव्हानात्मक आहे."                      






"आई कुठे काय करते मालिकेतील मी साकारलेल्या संजना या पात्राला आणि तिच्या लूकला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. तेजस्विनी कामतचाही ग्लॅलमरस अंदाज पाहायला मिळेल. माझ्या लूकवर संपूर्ण टीमनं बरीच मेहनत घेतली आहे. मी हे नवं पात्र साकारण्यासाठी प्रचंड उत्सुक आहे...", अशी भावना रुपाली भोसलेने व्यक्त केली. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Ramayana Star Yash: 1200 कोटींच्या ब्लॉकबस्टर फिल्मचा हिरो, कधीकाळी 300 रुपये घेऊन घरातून पळून आलेला; आता साकारतोय बॉलिवूडच्या सर्वात महागड्या फिल्मचा विलन