Lishalliny Kanaran : मलेशियात जन्मलेली भारतीय वंशाची अभिनेत्री आणि टीव्ही होस्ट लिशालिनी कनारन हिने एक धक्कादायक आरोप केला आहे. तिने एका पुजाऱ्यावर आशीर्वाद देण्याच्या बहाण्याने तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. हा प्रकार आता मलेशियन पोलिसांकडे पोहोचला असून आरोपी पुजाऱ्याचा शोध सुरू आहे. सोशल मीडियावर लिशालिनीने एक दीर्घ पोस्ट शेअर करत आपली आपबीती सांगितली आहे.

मंदिरात घडली घटना


लिशालिनीच्या पोस्टनुसार, ही घटना गेल्या शनिवारी सेपांग येथील मरिअम्मन मंदिरात घडली. ही बाब लोकांच्या लक्षात आली तेव्हा तिने सोशल मीडियावर आपली कहाणी शेअर केली.


आई भारतात, म्हणून एकटीच मंदिरात


लिशालिनी काही काळापासून आध्यात्मिकतेकडे वळली होती आणि नियमितपणे मंदिरात जात होती. त्या दिवशी ती एकटीच मंदिरात गेली होती, कारण तिची आई भारतात होती. तिच्या म्हणण्यानुसार, त्या दिवशी नेहमीप्रमाणे विधी करत असलेल्या पुजाऱ्याने तिला प्रार्थनेच्या वेळी ‘पवित्र जल’ आणि ‘रक्षासूत्र’ देण्याची ऑफर दिली.


विशेष आशीर्वादासाठी ऑफिसमध्ये बोलावलं


तिने लिहिलं, "पूजा झाल्यानंतर पुजाऱ्याने मला सांगितलं की एक तास थांब, मी तुला खास आशीर्वाद देतो." त्यानंतर तो तिला आपल्या खास ऑफिसमध्ये घेऊन गेला. "मी त्याच्या मागे गेले, पण काहीतरी चुकीचं घडतंय असं मला वाटू लागलं. आतून अस्वस्थ वाटू लागलं."


डोळ्यांत जळजळ सुरू झाली


पुजाऱ्याने एका तीव्र वास असलेल्या द्रवपदार्थाला पाण्यात टाकलं आणि सांगितलं की हे पवित्र आहे आणि सर्वसामान्य लोकांसाठी नाही. नंतर त्याने ते पाणी तिच्या चेहऱ्यावर फवारायला सुरुवात केली आणि सांगितलं की हे भारतातून आणलं आहे. इतकं पाणी तिने टाकलं की लिशालिनीच्या डोळ्यांना जळजळ होऊ लागली आणि डोळे उघडताही येईना.


"त्याने हात माझ्या ब्लाउज आणि ब्रा मध्ये घातले…"


लिशालिनीने खुलासा केला की, त्यानंतर जे घडलं ते अत्यंत संतापजनक होतं. "कोणतीही पूर्वसूचना न देता त्याने हात माझ्या ब्लाउजखाली, ब्रामध्ये घातले आणि मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करू लागला." लिशालिनी म्हणते, "अशा विश्वासघाताने मनाला खोल जखम होते. मी अधिक तपशील देणार नाही, पण त्या पुजाऱ्याने माझ्यावर लैंगिक अत्याचार केला आणि मी काहीच करू शकले नाही."


मलेशियन पोलिसांकडून तपास सुरू


मलेशियातील पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे आणि आरोपी पुजाऱ्याचा शोध घेतला जात आहे. सोशल मीडियावर या घटनेबद्दल संताप व्यक्त केला जात आहे आणि अनेक नागरिक मंदिर प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून कठोर कारवाईची मागणी करत आहेत.




इतर महत्त्वाच्या बातम्या 


Ramayana Star Yash: 1200 कोटींच्या ब्लॉकबस्टर फिल्मचा हिरो, कधीकाळी 300 रुपये घेऊन घरातून पळून आलेला; आता साकारतोय बॉलिवूडच्या सर्वात महागड्या फिल्मचा विलन