Crakk Teaser Out: अभिनेता विद्युत जामवाल (Vidyut Jammwal),अर्जुन रामपाल (Arjun Rampal) आणि अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) यांचा  'क्रॅक' (Crakk) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा धमाकेदार टीझर नुकताच रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये  विद्युत जामवाल हा विविध स्टंट्स परफॉर्म करताना दिसत आहे.


विद्युत जामवालच्या जबरदस्त स्टंट्सनं वेधलं लक्ष (Crakk Teaser Out)


क्रॅक या चित्रपटाच्या टीझरमध्ये विद्युत जामवालचे अॅक्शन सीन्स आहेत. यामध्ये विद्युत हा विविध स्टंट्स परफॉर्म करताना दिसत आहे. टीझरमध्ये विद्युत हा  डोंगराच्या माथ्यावर बाईक चालवणे, उंच इमारतीवरून उडी मारणे आणि वेगाने गाड्या चालवणे हे स्टंट करताना दिसत आहे. "जिंदगी तो साला सब के साथ खेलती है... लेकिन असली प्लेयर तो वही है जो जिंदगी के साथ खेले" हा डायलॉग क्रॅक चित्रपटाच्या टीझरमध्ये ऐकू येतो. तसेच टीझरमध्ये नोरा फतेही ही ग्लॅमरस लूकमध्ये दिसत आहे तर अर्जुन रामपालची झलक देखील या टीझरमध्ये दिसत आहे."जीतेगा तो जीएगा" हा विद्युतचा डायलॉग देखील टीझरमध्ये ऐकू येत आहे.


विद्युतनं शेअर केला टीझर


विद्युतनं सोशल मीडियावर क्रॅक या चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. या टीझरला त्यानं कॅप्शन दिलं, "जीतेगा तो जियेगा! ब्रेक न घेणाऱ्या पल्स-पाउंडिंग प्रवासासाठी सज्ज व्हा" या टीझरवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "नेहमीप्रमाणेच सर्वोत्कृष्ट अभिनेते विद्युत जामवाल हिट चित्रपटासाठी सज्ज झाला आहे." तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "अॅक्शन किंग इज बॅक"


कधी रिलीज होणार क्रॅक?


आदित्य दत्त दिग्दर्शित  'क्रॅक' हा चित्रपट 23 फेब्रुवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.  विद्युत जामवाल, अब्बास सय्यद आणि प्रांजल खंडाडिया यांनी मिळून या चित्रपटाची निर्मिती केली आहे.


पाहा टीझर:






विद्युतचा आयबी 71 (IB 71) हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता विद्युतच्या  'क्रॅक' या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Vidyut Jammwal: पाण्यात मारली डुबकी, चुलीवर बनवली मॅगी; विद्युतच्या जंगलातल्या न्यूड फोटोशूटची चर्चा