Vidyut Jammwal: अभिनेता विद्युत जामवाल (Vidyut Jammwal) हा सध्या त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आहे. विद्युतनं त्याचे काही जंगलामधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तो पाण्यात डुबकी मारताना दिसत आहे. तसेच एका फोटोमध्ये तो चुलीवर मॅगी देखील बनवताना दिसत आहे. विद्युत जामवालच्या या न्यूड फोटोशूटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. त्याच्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव देखील केला आहे. 


फोटोला विद्युतनं दिलं खास कॅप्शन 


विद्युत जामवालनं त्याचे जंगलामधील न्यूड फोटो सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "हिमालय पर्वतरांगांमध्ये मी पुन्हा गेलो, “ हा दैवी निवास” 14 वर्षांपूर्वी सुरू झाला.  दरवर्षी 7-10 दिवस एकटे घालवणे हा माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे."


पुढे त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं,  "चैनीच्या आणि आनंदाच्या जीवनातून वाळवंटात आल्यावर, मला माझा एकटेपणा शोधण्यात आणि "मी कोण नाही" हे जाणून घेण्याचे महत्त्व समजूण घेण्यात आनंद होतो. ही "मी कोण आहे" हे जाणून घेण्याची पहिली पायरी आहे, ही निसर्गाने आल्याला प्रदान केलेली लक्झरी आहे."


"मी माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर सर्वात कम्फर्टेबल असतो. इथेच मी स्वतःला घेरून घरी परत येऊ इच्छित असलेली उर्जा निर्माण करतो, माझ्या आयुष्यातील एक नवीन अध्याय अनुभवण्यासाठी तयार होतो. मी आता माझ्या पुढच्या अध्यायासाठी तयार आणि उत्साहित आहे - CRAKK हा चित्रपट 23 फेब्रुवारी 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. माझे हे फोटो  स्थानिक मेंढपाळ मोहर सिंहनं काढले आहेत", असंही विद्युतनं कॅप्शनमध्ये लिहिलं.


नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स


अनेक नेटकऱ्यांनी विद्युतच्या या न्यूड फोटोशूटवर कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "मोगली" तर दुसऱ्यानं कमेंट केली, "भावाला वाटतंय की तो बेयर ग्रील्स आहे"






विद्युतचा आगामी चित्रपट


विद्युत हा CRAKK या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात नोरा फतेही आणि अर्जुन रामपाल यांच्या देखील भूमिका आहेत. हा चित्रपट 23 फेब्रुवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


IB 71 OTT Release: विद्युत जामवाल आणि अनुपम खेर यांचा IB 71 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज; प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार चित्रपट