Bigg Boss 17 Nazila Sitanshi on Breakup With Munawar Faruqui : 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय वादग्रस्त कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातील स्पर्धक आपल्या खेळीने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. अशातच आता मुनव्वर फारूकीवर (Munawar Faruqui) आयशा खानने डबल डेट करत असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान मुनव्वरची गर्लफ्रेंड नाजिला सीताशीने (Nazila Sitaishi) त्याच्यासोबत ब्रेकअप केला आहे.


'बिग बॉस 17' या कार्यक्रमातील स्पर्धक वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. ईशा मालवीयनंतर मुनव्वर फारुकीचं वैयक्तिक आयुष्य जगासमोर आलं आहे. या कार्यक्रमात मुनव्वरने नाजिला सीताशीला आपली गर्लफ्रेंड बनवलं आहे. दरम्यान आयशा खानची बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या भागात मुनव्वर आणि आयशामध्ये चांगलच नाट्य पाहायला मिळालं. मुनव्वरला अश्रू अनावर झाले होते. नाजिलाने इंस्टा लाईव्हच्या माध्यमातून मुनव्वरसोबत ब्रेकअप केला आहे.


नाजिलाने मुनव्वरसोबतचं नातं तोडलं


'बिग बॉस 17'च्या (Bigg Boss 17) नुकत्याच पार पडलेल्या भागात आयशा खान, मुनव्वर फारूकीचा ड्रामा पाहायला मिळाला आहे. हा ड्रामा पाहिल्यानंतर मध्यरात्री इंस्टावर लाईव्ह येत नाजिला सीताशीने मुवव्वरसोबतचं नातं तोडलं. मुनव्वर हा खोटारडा असल्याचं ती म्हणाली. 






नाजिला सीताशी काय म्हणाली? 


नाजिला सीताशी म्हणाली,"मी रिलेशनमध्ये होते आणि त्या रिलेशनचा मी कायमच आदर करत आले आहे. वैयक्तिक गोष्ट जगजाहीर करायला मला आवडत नाही. मुनव्वर आणि आयशचं नातं मला माहिती नाही. पण आता ऑनलाईन येत मला यासंदर्भात बोलावं लागत आहे. मुनव्वर आणि आयशाच्या नात्याबद्दल मला काही माहिती नव्हतं. मुनव्वरचं फक्त माझ्यावर प्रेम आहे, असं मला वाटत होतं. पण आयशासह अनेक मुलींना तो डेट करत आहे. आयशाला एकटीला डेट करत असता तरी मी त्याला माफ केलं असतं. पण आजचा एपिसोड पाहिल्यानंतर मुनव्वर आणि माझं नातं आता संपलं आहे". 


खानजादीचा 'बिग बॉस 17'मधील प्रवास संपला


'बिग बॉस 17'च्या नुकत्याच पार पडलेल्या भागातून फिरोजा खान उर्फ खानजादीचा प्रवास संपला आहे. खानजादी 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडल्याने सदस्य हैराण झाले आहेत. 'बिग बॉस 17'मध्ये या आठवड्यात मुनव्वर फारुकी, नील भट्ट, खानजादी, अभिषेक कुमार आणि विकी जैन या स्पर्धकांना नॉमिनेट करण्यात आलं होतं. यात कमी वोट्स मिळाल्याने खानजादीचा प्रवास संपला आहे. 


'बिग बॉस 17'मधील 'या' स्पर्धकांचा संपला प्रवास


'बिग बॉस 17'मध्ये काही वाईल्ड कार्ड स्पर्धकांची एन्ट्री झाली आहे. तर काही स्पर्धकांचा मात्र प्रवास संपला आहे. जिग्ना वोरा, सोनिया बंसल, मनस्वी ममगई आणि नाविद सोले या स्पर्धकांचा 'बिग बॉस 17'मधील प्रवास संपला आहे. पण खानजादी बाहेर पडल्याने त्याचे चाहते मात्र नाराज झाले आहेत. 


संबंधित बातम्या


VIDEO: बिग बॉसच्या घरात हमसून हमसून रडली अंकिता; विकीसोबत 'या' कारणामुळे झाली बाचाबाची