Coffee Movie : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने बॉलिवूडने सावधान भूमिका घेतली असली तरी मराठी सिनेमांनी मात्र चांगलाच धुमाकूळ घातला आहे. 'झिम्मा', 'पांडू' नंतर 'कॉफी' सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्पृहा जोशी आणि सिद्धार्थ चांदेकरचा 'कॉफी' सिनेमा येत्या शुक्रवारी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 


वाफाळत्या कॉफीचा घोट आणि त्याचा अद्भूत सुगंध प्रत्येकाचा दिवस रम्य करुन टाकत असतो. प्रेमात पडलेल्या प्रत्येकाच्या कॉफी सोबतच्या गोड आठवणी असतात. कॉफीला स्वत:चा असा प्यारवाला अंदाज आहे. अशाच प्यारवाल्या अंदाजात लवकरच मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट बॉय सिद्धार्थ चांदेकर, कश्यप परुळेकर आणि अभ्यासू अभिनेत्री स्पृहा जोशी 'कॉफी' नावाचा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा 14 जानेवारीला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.





प्रेमातील चढउतारांचा व कडू गोड आठवणींचा हा प्रवास दाखवताना रणजित, रोहित, रेणु या तिघांच्या आयुष्याची कथा 'कॉफी' चित्रपटात पहायला मिळणार आहे. काही कारणामुळे उद्भवलेला आयुष्याचा गुंता हे तिघं कशाप्रकारे हाताळणार? याची मनस्पर्शी कथा म्हणजे 'कॉफी' सिनेमा. गोव्यातील अनेक नयनरम्य स्थळांवर 'कॉफी' सिनेमाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. वेगवेगळी वळण घेत 'कॉफी' ची कथा रंगणार असून प्रेक्षकांसाठी ही रोमँटिक ट्रीट असणार आहे.


संबंधित बातम्या


Coffee Movie : 14 जानेवारीला चाखता येणार स्पृहा-सिद्धार्थच्या प्रेमाची लज्जतदार 'कॉफी'


Rekha Kamat : आजच्या तरुणांची आजी ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत यांचे निधन


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha