Coffee Movie : राज्यसरकारने सिनेमागृह सुरू करायला परवानगी दिल्यापासून बॉलिवूड सह मराठी सिनेमांच्या प्रदर्शनांच्या तारखा समोर येत आहेत. वाफाळत्या कॉफीचा घोट आणि त्याचा अद्भूत सुगंध प्रत्येकाचा दिवस रम्य करुन टाकत असतो. प्रेमात पडलेल्या प्रत्येकाच्या कॉफी सोबतच्या गोड आठवणी असतात. कॉफीला स्वत:चा असा प्यारवाला अंदाज आहे. अशाच प्यारवाल्या अंदाजात लवकरच मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट बॉय सिद्धार्थ चांदेकर, कश्यप परुळेकर आणि अभ्यासू अभिनेत्री स्पृहा जोशी 'कॉफी' नावाचा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा 14 जानेवारीला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 


एखाद्या जीवलगासोबत जिची साथ हवीहवीशी वाटते ती म्हणजेच 'कॉफी'. कॉफीचा काळसर रंग, थोडीशी कडवट चव कित्येकांचा वीक पॉइंट बनत असतो. अशीच तजेलदार कॉफी घेऊन मराठीतील नामांकित कलाकार मंडळी प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. नुकतेच या सिनेमाच्या आकर्षक पोस्टरचे अनावरण करण्यात आले आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन नितीन कांबळे यांनी केलेले आहे. तर कैलास सोरारी आणि विमला सोरारी या सिनेमाचे निर्माते आहेत. 


Diwali Special Ovya : 'ओव्यांचा खजिना' प्रेक्षकांची दिवाळी करणार खास


प्रेमाचे वेगवेगळे अनुभव प्रत्येकजण घेत असतो. अशाच काहीशा गोड-कटू अनुभवाच्या प्रेमाची लज्जतदार गोष्ट 'कॉफी' चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. चित्रपटाची कथा-पटकथा मच्छिंद्र बुगडे यांची असून संवाद मच्छिंद्र बुगडे आणि नितीन कांबळे यांनी लिहिले आहेत. या सिनेमाच्या संकलनाची धुरा राहुल भातणकरने सांभाळली आहे. तर या सिनेमाचे गीत अशोक बागवे आणि नितीन कांबळे यांनी लिहिली आहेत. 


स्पृहा जोशी आणि सिद्धार्थ चांदेकरची जोडी 
स्पृहा जोशी आणि सिद्धार्थ चांदेकरची जोडी याआधी 'लॉस्ट अॅन्ड फाउंड' या सिनेमात तर 'प्रेम हे' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. दोन विरुद्ध मनं एकत्र आल्यावर काय होऊ शकतं हे त्यांच्या अभिनयाद्वारे दिसून आले आहे. या जोडीवर प्रेक्षकांनीदेखील भरभरुन प्रेम केले. आता आगामी सिनेमादेखील ही जोडी गाजवणार आहे. 


Rajnikant Medical Bulletin : सुपरस्टार रजनीकांत यांच्यावर पार पडली शस्त्रक्रिया, मेडिकल बुलेटिन जारी