Chinmay Mandlekar : 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांच्यासह सिनेमातील कलाकारांचेदेखील प्रचंड कौतुक होत आहे. या सिनेमात पल्लवी जोशी (Pallavi Joshi) आणि चिन्मय मांडलेकरची (Chinmay Mandlekar) महत्त्वपूर्ण भूमिका आहे. सोशल मीडियावर सध्या चिन्मय मांडलेकरने साकारलेल्या बिट्टा कराटे या भूमिकेचे कौतुक होत आहे. 


'द कश्मीर फाइल्स' सिनेमात अभिनेता चिन्मय मांडलेकरने दहशतवादी बिट्टाची भूमिका साकारली आहे. सिनेमा पाहताना प्रेक्षक या भूमिकेचा तिरस्कार करत आहेत. प्रेक्षकांना या भूमिकेचा प्रचंड राग येत आहे. बिट्टा कराटेची भूमिका अंगावर शहारे आणते. सिनेमात चिन्मय मांडलेकर काश्मिरी पंडितांना बेघर करणार क्रूर दहशतवादी आहे.





चिन्मयचे 'पावनखिंड' आणि 'द कश्मीर फाइल्स' हे दोन्ही सिनेमे सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. या दोन्ही सिनेमातील चिन्मयची भूमिका वेगळी आहे. पावनखिंड सिनेमात चिन्मयच्या डोळ्यात करारीपणा दिसतो. तर 'द कश्मीर फाइल्स'मध्ये कौर्य दिसते. त्यामुळे चिन्मयच्या अभिनयाचे चाहत्यांकडून कौतुक होत आहे. 


संबंधित बातम्या


The Kashmir Files : ‘सत्य समोर आणणारे असे आणखी चित्रपट बनले पाहिजेत’, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ‘द काश्मीर फाईल्स’चे कौतुक!


The Kashmir Files Box Office Collection Day 4: आठवड्याच्या पहिल्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर दिसली ‘द काश्मीर फाईल्स’ची जादू!  


The Kashmir Files :  बॉक्स ऑफिसवरील यशानंतर आता 'द कश्मीर फाइल्स' ओटीटीवर; 'या' प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha