The Kashmir Files : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींचा (Vivek Agnihotri) 'द कश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. काश्मीरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर भाष्य हा चित्रपट आता थिएटरमध्ये सुपरडुपर ब्लॉकबस्टर ठरला आहे. सुरुवातीच्या दोन दिवसांत हा चित्रपट मेट्रोसिटीमधील लोकांना आकर्षित करत होता, पण आता चित्रपटाने देशभरातील लोकांना चित्रपटगृहांकडे वळण्यास भाग पाडले आहे. 


'द काश्मीर फाईल्स'ने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 3.25 कोटींची कमाई केली होती. मात्र, जसजसे दिवस पुढे सरकले, तसतशी या चित्रपटाची कमाई देखील वाढली आहे. या चित्रपटाने वीकेंडला एकूण 15.10 कोटींची कमाई केली. मात्र, आठवड्याच्या पहिल्या दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आत्तापर्यंत या चित्रपटाने एकूण 42.20 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. 'द काश्मीर फाईल्स' लवकरच 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.


'द काश्मीर फाईल्स'चे कलेक्शन :


शुक्रवार : 3.25 कोटी


शनिवार : 8.50 कोटी


रविवार : 15.10 कोटी


सोमवार : 15.05 कोटी


एकूण : 42.20 कोटी



‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट भारतात एकूण 561 चित्रपटगृहात, 113 परदेशातील स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. कमी स्क्रीन मिळूनही या चित्रपटाने चांगला व्यवसाय केला आहे. ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट 11 मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर देखील हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे. चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाला आणि कथानकला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.


'द कश्मीर फाईल्स' चित्रपटात मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty), पल्लवी जोशी (Pallavi Joshi), अनुपम खेर (Anupam Kher) आणि दर्शन कुमार (Darshan Kumar) अशी तगडी स्टारकास्ट आहे. हा चित्रपट भूतकाळ आणि वर्तमान दोन्हीवर भाष्य करणारा आहे. सोशल मीडियावरही सध्या हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha