PM on The Kashmir Files : ‘द कश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित या चित्रपटाचे सर्वजण कौतुक करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी  (PM Narendra Modi) नुकतीच चित्रपटाच्या टीमचीही भेट घेतली होती. आता, मंगळवारी झालेल्या भाजप संसदीय दलाच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटावरही चर्चा केली आहे. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘चित्रपटात जे दाखवलंय, ते सत्य नेहमीच दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.’


या चित्रपटातून सत्य समोर आणण्यात आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. या चित्रपटाचे कौतुक करताना त्यांनी असेही म्हटले की, ‘हे सत्य दडपण्यासाठी एक इकोसिस्टम काम करते. सत्य समोर आणण्यासाठी असे आणखी चित्रपट बनवले पाहिजेत.’


 





‘द काश्मीर फाईल्स’च्या कलाकारांनी घेतली पंतप्रधानांची भेट!


'द कश्मीर फाईल्स' चित्रपटाचे निर्माते अभिषेक अग्रवाल (Abhishek Agarwal), विवेक रंजन अग्निहोत्री (Vivek Agnihotri) आणि अभिनेत्री पल्लवी जोशी (Pallavi Joshi) यांनी नुकतीच पंतप्रधानांची भेट घेतली. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून खूप आनंद झाला. त्यांनी आमच्या चित्रपटाचं कौतुक केलं. धन्यवाद मोदीजी', असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचे फोटो अभिषेक अग्रवाल यांनी ट्विटरवर शेअर केले आहेत.



बॉक्स ऑफिसवरही चित्रपटाची जादू!


'द कश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. काश्मीरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर भाष्य हा चित्रपट आता थिएटरमध्ये सुपरडुपर ब्लॉकबस्टर ठरला आहे. 'द काश्मीर फाईल्स'ने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 3.25 कोटींची कमाई केली होती. मात्र, जसजसे दिवस पुढे सरकले, तसतशी या चित्रपटाची कमाई देखील वाढली आहे. या चित्रपटाने वीकेंडला एकूण 15.10 कोटींची कमाई केली. मात्र, आठवड्याच्या पहिल्या दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आत्तापर्यंत या चित्रपटाने एकूण 42.20 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. 'द काश्मीर फाईल्स' लवकरच 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha