(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CM Eknath Shinde : मराठी मुलुखाच्या प्रतिभेची मोहर उमटवणाऱ्या कलावंताचा अभिमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
CM Eknath Shinde : 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कांरामध्ये बाजी मारणाऱ्या विविध श्रेणीतील चित्रपटांचे तसेच निर्माता, दिग्दर्शक, कलावंतांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलं आहे.
CM Eknath Shinde : 'मनोरंजन क्षेत्रातील मानाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठी मुलुखाच्या प्रतिभेची मोहर उमटवणाऱ्या कलावंताचा अभिमान आहे,' अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कांरामध्ये बाजी मारणाऱ्या विविध श्रेणीतील चित्रपटांचे तसेच निर्माता, दिग्दर्शक, कलावंत आणि तंत्रज्ञ आदींचे अभिनंदन केले आहे.
सिने प्रेमींसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज (22 जुलै) करण्यात आली. या पुरस्कार सोहळ्यात मराठी चित्रपटांना विविध विभागात पुरस्कार जाहीर झाले आहेत.
सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार मराठी चित्रपट 'सुमी'ने पटकावला आहे. तसेच सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून ख्यातनाम गायक राहूल देशपांडे यांना 'मी वसंतराव' चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांचेही मुख्यमंत्र्यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
'गोष्ट एका पैठणीची' (सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट), 'फनरल'(सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट), 'जून, गोदाकाठ, अवांछित' (तीनही विशेष उल्लेखनीय चित्रपट) पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत. नरवीर तानाजी मालुसरेंच्या पराक्रमांवर आधारित 'तानाजी - द अनसंग वॉरियर' या सिनेमाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार आणि त्यातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार मिळाल्याबद्दल अजय देवगण यांचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून पुरस्कार पटकावणाऱ्या अनिश गोसावी, आकांक्षा पिंगळे, दिव्येश इंदुलकर यांचेही मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले असून, त्यांचे अभिनंदन केले आहे. सध्या मनोरंजनसृष्टीत आनंददायी वातावरण आहे. विजेत्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
संबंधित बातम्या