Ramayana Movie Updates : दिग्दर्शक  नितेश तिवारीच्या (Nitesh Tiwari) 'रामायण' (Ramayan Movie) 'चित्रपटाबाबत सध्या रोज नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. 'रामायण' चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट सतत चर्चेत आहे. रणबीर कपूरची (Ranbir Kapoor) मुख्य भूमिका असलेल्या या पीरियड ड्रामामध्ये केजीएफ (KGF) स्टार यश (Yash) रावणाची भूमिका साकारणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या.


रावणाच्या भूमिकेला यशचा नकार


समोर आलेल्या माहितीनुसार,  यशने स्वतःला या चित्रपटापासून दूर केले आहे. यशने रावणाची भूमिका करण्यास नकार दिला आहे. नितेश तिवारीच्या चित्रपटात यश रावणाची भूमिका साकारणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती. पण आता ही भूमिका यश नाही तर अन्य कलाकार करणार आहे.


'रामायण'च्या टीममध्ये कोणती भूमिका साकारणार?


'झूम'ने दिलेल्या वृत्तानुसार, यशने रावणाची भूमिका करण्यास नकार दिला आहे. त्यासोबत त्याला 80 कोटींची ऑफर देण्यात आली होती. मात्र, यशनेही रावणाच्या भूमिकेसह 80 कोटींवर पाणी सोडले आहे. एका सूत्राने 'झूम'ला सांगितले की, यशने रावणाची भूमिका सोडली असली तरी तो चित्रपटाशी संबंधित असणार आहे. यश हा आता निर्माता म्हणून जबाबदारी पार पाडण्याच्या तयारीत आहे. मात्र, याबाबत चित्रपटाच्या टीमकडून अथवा यशकडून अधिकृतपणे माहिती देण्यात आली नाही. 


चित्रपटाच्या सेटवर नो फोन पॉलिसी लागू


नितेश तिवारी यांनी आपल्या बिग बजेट चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. मुंबईतील फिल्मसिटीमध्ये चित्रपटाचा भव्य सेट तयार करण्यात आला आहे. त्याची किंमत 11 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. अलीकडेच, दशरथच्या भूमिकेत अरुण गोविल आणि कैकईच्या भूमिकेत लारा दत्ता यांचा लूक सेटवरून समोर आला. याची दखल घेत नितेश तिवारी यांनी चित्रपटाच्या सेटवर फोन न करण्याचे धोरण लागू केले आहे. नितेश तिवारी हा चित्रपट तीन भागात बनवणार असल्याचे वृत्त आहे. 






चित्रपटाची स्टारकास्ट 


'रामायण'मध्ये रणबीर कपूर हा श्रीरामाची आणि  अभिनेत्री सई पल्लवी ही माता सीतेची भूमिका साकारत आहेत. त्याचबरोबर रामायणातील शूर्पणखाच्या भूमिकेसाठी कुब्रा सैत आणि हनुमानाच्या भूमिकेसाठी सनी देओलच्या नावाची चर्चा सुरू आहे. कास्टिंगबाबत अजून कोणतीही माहिती अधिकृतपणे देण्यात आली नाही.   


इतर संबंधित बातमी :